ओरिफ्लेमचा ब्रॅण्ड जिओर्डानी गोल्डचा ४५वा वर्धापन दिन

■अॅनिव्हर्सरी स्पेशल एडिशन ब्रॉण्झिंग पर्ल्सचे अनावरण ~


मुंबई, ८ डिसेंबर २०२१ : ओरिफ्लेम हा आघाडीचा सोशल-सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रॅण्ड त्यांचा लक्झरीअस ब्रॅण्ड जिओर्डानी गोल्डचा ४५वा वर्धापन दिन साजरा करत आहे. स्थापनेपासनूच जिओर्डानी गोल्डने तुम्हाला जीवन सुरेखरित्या जगण्यास मदत करण्याकरिता जगातील सर्वात विशेष कच्च्या सामग्रीने युक्त आकर्षक, प्रिमिअम उत्पादने निर्माण केली आहेत. या सुवर्ण टप्प्याला साजरे करण्यासाठी ब्रॅण्ड ४५वी अॅनिव्हर्सरी स्पेशल एडिशन ब्रॉण्झिंग पर्ल्सचे अनावरण करत आहे.


        प्रदेशातील सर्वात खास मोत्यांमधून प्रेरित अद्वितीय मोती जिओर्डानी गोल्ड हे साऊथ सीचे खजिना आहेत. प्रत्येक मोतीमध्ये आकर्षक लुक व चमकदार फिनिशसाठी हायलुरोनिक अॅसिड आहे, ज्यामधून तुमचे तारूण्य अधिक फुलून दिसते. लिमिटेड-एडिशन पर्ल्स तुम्हाला गोल्डन फिनिश व आकर्षक चमक देतात, जे त्यामधूनच दिसून येतात. हे मोती तुमच्या त्वचेची काळजी घेतात आणि आकर्षक ब्रॉण्झच्या लुकसह कोमल स्पर्शाचा अनुभव देतात. लक्झरीअस, आरामदायी फिलसाठी डिझाइन करण्यात आलेले ४५वी अॅनिव्हर्सरी स्पेशल एडिशन ब्रॉण्झिंग पर्ल्स उच्च टिकाऊपणा व दीर्घकाळापर्यंत टिकणा-या रंगासह निर्माण करण्यात आले आहेत.


       ओरिफ्लेमचे प्रवक्ता म्हणाले, "आम्हाला हा महत्त्वपूर्ण क्षण साजरा करताना आनंद होत आहे. मागील ४५ वर्षांमध्ये जिओर्डानी गोल्डने आकर्षक ब्रॉण्झिंग पर्ल्ससह काही प्रख्यात उत्पादने सादर केली आहेत. ४५वी अॅनिव्हर्सरी स्पेशल एडिशन ब्रॉण्झिंग पर्ल्स प्रख्यात उत्पादनासाठी क्रांतीच्या नवीन टप्प्याला सादर करतात. हायलुरोनिक अॅसिडने युक्त आणि जिओर्डानी गोल्डच्या साऊथ सी खजिनामधून प्रेरित हे मोती सुलभ, अधिक उत्साहपूर्ण व चमकदार रूपासह सर्वात आकर्षक लुक्सचा अनुभव देतील.

Post a Comment

0 Comments