स्टॉकविट्सची टाइम्स ब्रीज बरोबर गुंतवणूक भागीदारी


मुंबई, १९ डिसेंबर २०२१ : स्टॉक्स, क्रिप्टो आणि उदयोन्मुख गुंतवणूक पर्यायांसारख्या विविध असेट क्लासेसमधील गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठीचा पहिला सोशल प्लॅटफॉर्म असलेल्या स्टॉकविट्सने भारतीय ग्राहकवर्गाला दिल्या जाणा-या आपल्या सेवेचा अधिक विस्तार करण्यासाठी टाइम्स ब्रिज बरोबर धोरणात्मक भागीदारी केल्याची घोषणा आज केली. ही घडामोड म्हणजे स्टॉकविट्सने आपल्या सीरीज बी फंडिंगमध्ये अल्मेडा रिसर्च व्हेंचर्सच्या प्रमुख फंडिंगसह केलेल्या ३० दशलक्ष डॉलर्सच्या निधीउभारणीचा एक भाग आहे, ज्यात टाइम्स ब्रिजने केलेल्या गुंतवणुकीचाही समावेश आहे.


    या भागीदारीसह स्टॉकविट्सने टाइम्स ब्रिजच्या एअरबीएनबी, कोर्सरेरा, हेडस्पेस, हाऊज, स्‍मुले, स्टॅक ओव्हरफ्लो व उबर यांच्यासारख्या नव्या व्यवसायश्रेणी निर्माण करणा-या आणि आपल्या व्यवसाय श्रेणीमध्ये अग्रेसर असलेल्या कंपन्यांच्या वाढत्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये प्रवेश केला आहे. टाइम्स ब्रिज ही भारताची सर्वात मोठी व सर्वात जुनी मीडिया आणि डिजिटल कंपनी टाइम्स ग्रुपची ग्लोबल इन्व्हेस्टमेंट आणि व्हेंचर शाखा असून, जगातील सर्वाधिक हेतूलक्ष्यी कंपन्यांशी सहयोग साधून त्यांना भारतभरामध्ये विस्तारण्यासाठी आणि आपला प्रभाव टाकण्यासाठी सक्षम बनविणे हा या शाखेचा हेतू आहे. टाइम्स ग्रुपचा टाइम्स इंटरनेट हा विभाग भारतातच विकसित झालेला सर्वात मोठा भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे व बातम्या, स्ट्रीमिंग, संगीत, रिअल इस्टेट, क्रिकेट आणि फायनान्स अशा विविध श्रेणींमध्ये मिळून दर महिन्याला ५५७ दशलक्षांहून अधिक सक्रिय यूजर्स याचा वापर करतात.


       टाइम्स ब्रिजचे संस्थापक सीईओ ऋषी जेटली म्हणाले, "जगभरातील सर्वोत्कृष्ट कल्पना भारतामध्ये दाखल करणे, त्यांची व्याप्ती वाढविणे आणि त्यांना आघाडीचे स्थान मिळवून देणे हे टाइम्स ब्रिजचे ध्येय आहे. स्टॉकविट्स ही अशीच एक कल्पना आहे, जिने अनेक वर्षांपासून जगभरातील किरकोळ गुंतवणूकदारांना पथदर्शी सामाजिक उपाययोजना आणि गुंतवणूकींचे पर्याय उपलब्ध करून दिले आहे. आणि भारतातील गुंतवणूकदारांचा वाढला आलेख लक्षात घेऊन टाइम्स ब्रिज आणि संपूर्ण टाइम्स ग्रुप आपल्या मालमत्ता व ज्ञानाची ताकद वापरून स्टॉकविट्स प्लॅटफॉर्मच्या स्थानिकीकरणाच्या प्रयत्नांमध्ये, या मंचाची वाढ आणि प्रभाव यात वृद्धी घडवून आणण्यामध्ये त्यांची मदत करण्यास उत्सुक आहोत."

Post a Comment

0 Comments