स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्सव संपन्न


कल्याण , प्रतिनिधी : स्वामी समर्थ मठ फाँरेस्ट काँलनी येथे यंदाही सालाबादप्रमाणे सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टकल्याण (पश्चिम) यांच्या वत्तीने श्री दत्त जंयती उत्सव सोहळा भव्य पालखी सोहळा शनिवारी संपन्न झाला. दत्तजयंती उत्सव सप्ताहाचे औचित्य साधत सात दिवस श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण व दत्तयाग उत्सवानिमित्त संपन्न झाला. दत्त जयंती दिवशी दत्तयागाला सर्व गुरुबंधू, गुरुभगिनी व भाविकांना गुरूवर्य मोडक महाराजांनी आपल्यासोबत बसवून दत्तयागाची पूर्णाहुती व सांगता केली. 


          तसेच दत्तजयंती आधी एक दिवस श्री राम मारुती महाराज (समाधी मंदिर, लालचौकी) यांच्या पादुका मठात आणल्या गेल्या व त्या पादुका दत्तजयंती दिवशी स्वामींच्या पालखीमध्ये स्वामींच्या पादुकासोबत  ठेवुन  संध्याकाळी पालखी ४ वाजता मठामध्ये प्रदक्षिणा घालून छोटा म्हसोबा, मोठा म्हसोबा, काळा तलाव येथील साती आसरा व रामेश्वर मंदिर, लालचौकी येथील गावदेवी मंदिर येथे ओटी भरून पालखी दुर्गाडी किल्ल्यावर आई दुर्गाडी मातेच्या दर्शनासाठी जाते. तेथे महाआरती करून आधारवाडी, खडक पाडा, बिर्ला कॉलेज मार्गे रात्री ८ वाजता पालखी मठात आली.  ही पंरपंरा गेली ११वर्षापासून सुरु आहे.


            तसेच दत्त जंयती उत्सवानिमित्त सकाळी ९ ते १० स्वामींच्या पादुकांवर अभिषेक ११ते१वा. होमहवन, तसेच दुपारी १ते२गुरुपादुकाष्टक, मानसपुजा व हरिपाठ सदगुरु श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडाळाने सादर केला. तसेच रात्री ८वा. महाआरती रात्री ९.३०वा.सदगुरु श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाने संगीत भजन सादर केले. क्रार्यक्रमाचे यशस्वी नियोजन गुरुवर्य मोडक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मठातील शिष्यगणासह स्वामी भक्तांनी केले. यानिमित्ताने अनेक भविकांनी स्वामी दर्शनाचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments