फ, ह आणि आय प्रभागातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाईकल्याण, प्रतिनिधी  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली फ प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी डोंबिवली पूर्वगोपाळ नगर गल्ली क्र.3येथील बांधकामधारक जयदीप भागीनाथ त्रिभुवन यांच्या नावे असलेल्या तळ +3 मजल्याचे आर.सी.सी अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली.


          हि निष्कासनाची कारवाई टिळक नगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी/कर्मचारीग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे व शैलेश मळेकर उप अभियंता बांधकामप्रभाग अधिक्षक दिनेश वाघचौरेमहापालिकेचे पोलिस कर्मचारीअनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने व 3 ब्रेकर1 गॅस कटर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


त्याचप्रमाणे विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिमगणेश नगर येथीलखाडीकिनारी विकासक सचिन भोईर यांच्या तळ+4 मजली आर.सी.सी. इमारतीच्या चालू असलेल्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यास आज प्रारंभ केला. हि निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारीविष्णुनगर पोलिस स्टेशन पोलिस कर्मचारी,महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 1 पोकलन3 ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


आय प्रभागातही सहा. आयुक्त संजय साबळे यांनी विभागीय उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीआडीवली ढोकळीयेथील विकासक जयेश पटेल यांच्या तळ+4 आर.सी.सी अनधिकृत इमारत निष्कासनाची धडक कारवाई आज सुरू केली. या इमारतीत ऐ,बी,सी,डी असे एकूण चार विंग असून ऐ,बी व सी तळ+4 मजली आहे. डी विंग मध्ये तळ+2 मजली आहेआज रोजी सदर इमारतीतील डी विंगचे बांधकाम पूर्णपणे जमीदोस्त करण्यात आले आहे.


 हि निष्कासनाची कारवाई जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकरड प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले अधिक्षक गोवेकरमानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारीमहापालिकेचे पोलिस कर्मचारीअतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने व 1 पोकलन1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments