महापरीनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनोखा उपक्रम


ठाणे, प्रतिनिधी  :  महात्मा जोतिबा फुले नगर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समाज मंदिर, राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, येथे परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  सर्व सामान्य नागरिकांना भारतीय संविधानाची , मूलभूत अधिकार, कायद्याची ताकद काय असते हे दाखवण्याची गरज आहे या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रवादी युवक काँग्रेस  जिल्हा उपाध्यक्ष,ठाणे समीर साहेबराव नेटके यांच्या वतीने सत्य घटनेवर आधारित "जय भीम" चित्रपट मोठ्या पडद्यावर सर्व नागरिकांना दाखविण्यात आला.


        त्यावेळी प्रचंड जनसमुदाय आवर्जुन उपस्थित राहिला. सोबत माजी नगरसेविका सुरेखा ताई पाटील,कलवा मुंब्रा विधानसभा सचिव माणिकराव शिंदे, चेतन शिळकर, अजित चौहान,संदीप शिंदे,अर्जुन गायकवाड, अमोल मोहिते, अमर चौहान, सुमीत चौहान, अंबर शिंदे, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते . ते क्षण

Post a Comment

1 Comments

  1. या बातमीमधिल फोटोचा आणि तुम्ही दिलेल्या बातमीशी काही संबंध नाही. हा फोटो विटाव्या नाक्यावर क्रांतिसूर्य सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देताना आहे.याचा कोणत्याही राजकीय संघटनेशी काडीमात्र संबंध नाही. तुमच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कोणत्याही कार्यक्रमाचे फोटो वापरून बातमी तयार करून तुम्ही ती प्रसिद्ध करतात. त्वरीत हा फोटो काढून टाकावा.

    ReplyDelete