अदाणी समूहात स्थानिक ,भुमीपुत्र, कामगारांच्या मुला - मुलींना नोकऱ्यांसाठी शिवसेना मोर्चा


कल्याण , प्रतिनिधी  :-  मोहने गेट येथे शिवसेनेच्या माध्यमातून शुक्रवारी मोर्चा काढून  आगामी काळात आदाणी समुहात एन् आर् सी कामगार, भुमीपुत्र, स्थानिक कुशल आणि शैक्षणिक पात्रता असणाऱ्या बेरोजगार मुला मुलींना नोकर्या मिळाव्यात  तसेच एन् आर् सी शाळेतील शालेय विघार्थीची फी माफी संदर्भात आदाणी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले.                

            शिवसेनेच्या माध्यमातून काढलेल्या मागणी मोर्चचे नेतृत्व शिवसेना उप विभाग प्रमुख अंकुश जोगदंड यांनी केले. शिवसेनेचे माजी नगरसेवक, मयुर पाटील, दयाशंकर शेट्टी, विजय काटकर, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवाजी गोंधळे, राम तरे, अनिल गोवळकर, रोहन कोट आदी सह मोठ्या संख्येने तरूणाई उपस्थित होती. पोलिस बंदोबस्त होता. पोलिसांनी अदानी व्यवस्थानाशी मध्यस्थी करीत मोर्चे करांच्या शिष्टमंडळास निवेदन देण्यासाठी आत सोडले.


             निवेदनात पुर्वी ची एन् आर् सी कंपनी ही सन २०१९ नंतर आदाणी समुहाने विकत घेतलेली आहे. त्यामुळे या परिसराचा औघोगिक विकास हा निश्चित आहे. परंतु एन् आर् सी कंपनी बंद पडल्यानंतर तसेच लाँकडाऊनमुळे अनेक सुशिक्षित तरूण आणि स्थानिक भुमीपुत्र बेरोजगारीच्या उंबरठ्यावर बसलेले आहेत. त्यामुळे सध्या त्यांची घरची अर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली आहे. आपल्या कंपनीच्या मार्फत येणाऱ्या उघोगात भरपूर नोकर्या उपलब्ध होणार आहेत. तसेच आपणास सुशिक्षित मुला- मुलीची गरजही भासणार आहे.


           त्यामुळे  स्थानिक भुमीपुत्रांना नोकरी मध्ये प्राधान्य द्या,  स्थानिक परिसरातील आणि कौशल्य असणाऱ्या तरूणांही प्राध्यान्य द्या,  एन् आर् सी कामगारांचा  प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावाल, एन् आर् सी शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी माफी संदर्भात सहानुभूती चा विचार करावा आपल्या समुहाच्या विकासासाठी स्थानिक भुमीपुत्र, स्थानिक कुशल आणि शैक्षणिक पात्रता असणाऱ्या मुला - मुलीच्या व कामगारांच्या हितासाठी 


■विचार करावा अशी मागणी करण्यात आली.

     

        अदाणी व्यवस्थापनाने सुशिक्षित तरूणांचा डाटा तयार करून द्यावा जेणेकरून नोकरी संदर्भात त्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले असे अंकुश जोगदंड यांनी या निमित्ताने सांगितले.

Post a Comment

0 Comments