रांगोळीच्या माध्यमातून दिला विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा संदेश

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) इयत्ता पहिलीपासूनच्या शाळा सर्वत्र सुरू झाल्या.शाळा सुरू करण्याचे आदेश मिळाल्यानंतर सर्वत्र मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली.डोंबिवली पूर्वेककील ग्रींस इंग्लिश स्कूल या संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील व मुख्याध्यापिका अर्चना मोहिते यांच्या मार्गर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी चिमुकल्यांच्या स्वागताची उत्कृष्ठ तयारी केली.सुंदर फलकलेखन करून फुगे लावण्यात आले.


         शाळेच्या कलाशिक्षिका स्मिता साळुंखे यांनी शाळेच्या आवारात भव्य व आकर्षक अशी रांगोळी साकारली.तसेच या रांगोळीद्द्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे संदेश ही देण्यात आले.रांगोळी पाहिल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पालकांकडूनही रांगोळीची प्रशंसा करण्यात आली.शाळेचे सर्व सदस्य ,मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी पुष्वृष्टी करत मुलांचे स्वागत केले.


          सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत मुलांना वर्गात बसवण्यात आले.शिक्षकांना भेटल्यानंतर आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.शाळेचा पहिला दिवस असूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.पुन्हा मुलांचा किलबिलाट पाहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments