पर्यावरणाचा समतोल, विजेची बचत व प्रदूषण टाळण्यासाठी शाळेत प्रदर्शन


डोंबिवली ( शंकर जाधव ) विद्यार्थांनी पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल, विजेची बचत करण्यासाठी काय केलं पाहिजे , प्रदूषण टाळण्यासाठी काय केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या विषयावर डोंबिवली पूर्वेकडील 
मिलापनगर येथील ग्रीन्स इंग्लिश स्कूलमध्ये प्रदर्शन  भरविण्यात आले होते.


           विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने  प्रदर्शनाचं आयोजन केले होते. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त शिरीष देशपांडे, शेखर चिटणीस  व शिशिर देशपांडे उपस्थित होते.कोविड मूळे दिड वर्षे शाळा बंद असल्याकारणाने मुलांना आपलं कौशल्य दाखवता आलेले नव्हते. परंतु शाळा सुरू होताच ग्रीन्स इंग्लिश स्कूलमधील मुख्याध्यापिका अर्चना मोहिते व माधुरी प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. 


          इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यासाठी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन मोहन गोखले व अध्यक्ष डॉ.अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान विषयाच्या शिक्षकांचं व पालकांचं मोलाचं सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments