शहापूरच्या "वजीर" वरून बिपिन रावत ह्यांना श्रद्धांजली


कल्याण , प्रतिनिधी  : काही दिवसांपूर्वीच भारताचे पहिले तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत हे हेलिकॉप्टर अपघातात शहिद झाले. याअपघाताने संपूर्ण देश हळहळला. कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ने महाराष्ट्रातील सर्वात कठीण सुळखा असलेल्या वजीर वरून महाराष्ट्राच्या वतीने बिपीन रावत यांना  भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


        वजीर हा सुळखा शहापूर तालुक्यातील वशिंद गावात आहे. सुमारे २८० फूट उंचावर असलेला हा सुळखा ९० अंश कोनात उभा राहिलेला आहे. या मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांच्या वतीने भूषण पवार, पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, प्रदीप घरत, नितेश पाटील, अभिषेक गोरे, सुनील कणसे हे सहभागी झाले होते. त्याच सोबत मोहिमेत विशेष आकर्षण होते ते वयाची ५० पार केलेले गिर्यारोहकांनी सुद्धा सहभागी होऊन देशाच्या पहिल्या तिन्ही दल प्रमुख यांना श्रद्धांजली वाहिली.  ज्यात सुशील राऊत, प्रफुल वाळुंज, सचिन राणे आणि संतोष आंबरे यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments