त्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी मानले समाजसेवक अजय सावंत यांचे आभार

■अजिंठा फाउंडेशनच्या वतीने महापरीनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन...


कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण मधील एका खाजगी रुगणालयाने आपल्या ५० हून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नव्हते. याबाबत त्या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी पाठपुरावा केला यानंतर रुग्णालयाने या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या या लढ्यात कल्याण मधील अजिंठा फाउंडेशनचे संस्थापक आणि समाजसेवक अजय सावंत यांनी मोलाचे मार्गदर्शन करून मदत केली होती. याबद्दल या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अजिंठा फाउंडेशनच्या कार्यक्रमात अजय सावंत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देत त्यांचे आभार मानले आहेत.    


 कल्याण मधील कर्णिक रोड परिसरातील ए अॅण्ड जी रुग्णालयात कोरोनाच्या काळात अहोरात्र जीवाची बाजी लावून कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या गरोदर नर्ससह कर्मचाऱ्यांना रुग्णालयाने एक वर्षाचे वेतन देण्यासाठी नकार दिल्याने या कर्मचाऱ्यांची वेतन मिळवण्यासाठी भटकंती सुरु होती. यावेळी समाजसेवक अजय सावंत यांनी त्यांना मदत करत मागर्दर्शन केल्याने त्यांनी पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. यानंतर जागे झालेल्या हॉस्पिटल प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात पगार दिला असून उर्वरित एक टप्पा जानेवारी अखेरीस दिला जाणार आहे. अजय सावंत यांनी केलेल्या मदतीने हे शक्य झाल्याने आम्ही त्यांचे आभार मानले असल्याची माहिती सिद्धार्थ सूरडकर यांनी दिली.    


      दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अजिंठा फाउंडेशनच्या वतीने कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांना पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी अजिंठा फाउंडेशनचे संस्थापक अजय सावंत, समाजसेवक रवी गायकरअनिल धनगरसुधीर जगतापकैलास शिर्केधनेश भालेरावनिनाद गवळीभगवान मोरेदेवा सुरळकरविनोद भालेरावसुमतीलाल जैनयोगेश नाटकर,  सिद्धार्थ सुरडकर   आणि ए अँड जी हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments