एक लाख कामगारांच्या कुटुंबियांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार... कामा संघटनेचा पुढाकार


डोंबिवली ( शंकर जाधव ) कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना कायम नोकरी आणि पगार यात आपले आयुष्य काढावे लागते.कामगारांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या रोजगाराबाबत कारखानदारांनी पुढाकार घेतल्याचे फार त्वचीत उदाहरण असतील.आपल्या एक लाख कामगारांना करोना काळात पगार देऊन त्याच्या उदरनिर्वाहचा प्रश्न सोडविणाऱ्या कल्याण अंबरनाथ मन्युफॅचरिंग असोशिएशनने (कामा संघटना ) आपल्या समाजकार्यात आणखी महत्वाचे पाउल उचलले आहे.


         कामा संघटनेने आपल्या कारखान्यातील सुमारे एक लाख कामगारांच्या कुटुंबियांनाचा रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. त्यांना कौशल्य शिबिरात विविध योजनांची माहिती देऊन त्यात प्रशिक्षितांकडून कोर्स पूर्ण करून घेतला जाणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांना रोजगारही उपलब्ध करून देण्याची हमीही संघटनेने घेतल्याचीमाहिती कामा संघटनेनेच माजी अध्यक्ष डॉ. देवेन सोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

         पत्रकार परिषदेत कामा संघटनेचे अध्यक्ष डॉ. नारायण टेकाडे,माजी अध्यक्ष डॉ.देवेन सोनी, डॉ. उदय वालावलकर,सेक्रेटरी डॉ.आदित्य नाकेर,उपाध्यक्ष डॉ. कमल कपूर,डॉ.मुरली अय्यर, डॉ.राजू बैलूर आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कर,रस्ता,वीज आणि इतर सुविधांबाबत डॉ सोनी यांनी माहिती दिली. डोंबिवली फेज-१ आणि डोंबिवली- फेज २ मध्ये सुमारे ४५० कारखाने हे संघटनेचे सदस्य आहेत. सरकारने रस्त्याबाबत कारखान्याला लागण्यात आलेला कर हा अन्यायकारक असून यासंदर्भात संघटनेए हरकत घेतली आहे.पाण्याबाबत बोलताना डॉ. सोनी यांनी पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे त्याचा परिमाण उद्योगांवर होत असल्याचे सांगितले.


       यामुळे उत्पादन क्षमता कमी होत असून त्याचा फटका निर्यात होत आहे. डोंबिवलीतील बहुतेक उद्योजक आपला माल इतर देशात निर्यात करत असल्याने राज्याला महसूल वाढ मिळते.याचा विचार राज्य शासनाने करणे आवश्यक आहे. कारखान्यात काम करताना आग लागल्याच्या घटना घडल्या तर कामगारांनी आपला जीव कसा वाचवावा यासाठी संघटना सेफ्टी सेमिनार घेत असते.कौशल्य शिबिराच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. एका संस्थेने प्रदूषणात केलेल्या २०२१ च्या सर्व्हेच्या अहवालानुसार कारखान्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण हे फक्त दोन टक्के, कचऱ्याने बारा  टक्के तर रोडवरील व्हेरीकलचे प्रमाण ३८ टक्के असल्याची माहिती माजी अध्यक्ष डॉ. सोनी यांनी सांगितले.

 

चौकट


 डोंबिवली एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील २६ ठिकाणी एमआयडीसी विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लागणार जाणार आहे. या तिसऱ्या डोळ्याची नजर या परिसरावर राहणार असून केमिकल मिश्रित सांडपाणी नाल्यात टाकून प्रदूषण करणाऱ्या टॅकरला पकडण्यास मदत होणार आहे अशी माहित काम संघटनेने माजी अध्यक्ष डॉ. देवेन सोनी  यांनी दिली.

Post a Comment

0 Comments