भिवंडी महापालिकेची कोरोना लसीकरणासाठी धडक कारवाई, कोरोना लसीचे दोन डोस न घेणाऱ्या कामगार, व्यापाऱ्यांची दुकाने, हॉटेल, बेकरी सील...


भिवंडी दि 10 (प्रतिनिधी )केंद्र आणि राज्य शासन कोरोना लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असताना  भिवंडी शहरात मात्र कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लसीकरण  गांभीर्याने घेऊन शहरातील दुकाने, हॉटेल, विविध अस्थापना मध्ये काम करणाऱ्या कामगार, मालक, व्यापारी यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले की नाही याची तपासणी करून दुकाने, हॉटेल, बेकरी सील करून दंड वसुल करून दोन्ही डोस घेण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.


        त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या एक ते पाचही प्रभागात असलेल्या  अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके  तयार करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात असलेली दुकाने, हॉटेल, बेकरी आणि विविध आस्थापना तपासन्यास सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2,प्रभाग क्रमांक,प्रभाग क्रमांक 3,  प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक आणि प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत येणाऱ्या बाजारपेठा, गल्ली बोळात असलेली दुकाने, हॉटेल, बेकरी सह आस्थापना असलेल्या तब्बल   24  ठिकाणी  चौकशी केली असताना व्यापारी, कामगारांनी कोरोना लस घेतली नसल्याचे आढळून आले त्याच प्रमाणे मास्क लावले नसल्याचेही आढळून आल्याने  महापालिका अधिकाऱ्यांनी दुकाने, हॉटेल, बेकरी  सील करून कारवाई केली.         त्यानंतर मालकांनी विनवणी करून  कोरोना लस घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीप्रमाणे 500 रुपये दंड आकारून विविध ठिकाणी  आतापर्यंत 44 हजार रुपयांचा   दंड  आकारून सर्व दंड  लेखा विभागात जमा करण्यात आला  आहे.या धडक कारवाई मुळे दुकान, हॉटेल मालक,व्यापारी,कामगार यांच्यात चांगलीच खळबळ माजली असून त्यांची  कोरोना लस घेण्यासाठी चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या धडक कारवाई मुळे  व्यापारी, दुकान मालक,कामगार यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली असून आपली दुकाने हॉटेल ,व्यवसाय सुरु ठेवायचा असेल तर लस घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने आता लसीकरणाला वेग येण्याची शक्यता वातावण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments