कल्याण, प्रतिनिधी : पडघा टोल नाका येथून जुनी पेन्शन हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या मार्चला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून शिक्षक या मार्चमध्ये सहभागी झालेले आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या शिक्षक बांधवांच्या भविष्यासाठी ही संपूर्ण कृती समिती खूप मोठं शिवधनुष्य घेऊन निघालेली आहे. शिक्षकांच्या या न्याय हक्कासाठी भाजपा शिक्षक आघाडी यांच्या वतीने पहिल्याच दिवशी सोनाळे गाव येथील ग्राउंड वर हा मार्च मुक्कामी असताना भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग कार्यवाह विनोद शेलकर, कल्याण जिल्हा संयोजक सुभाष सरोदे, जिल्हा सचिव अनिरुद्ध चव्हाण, कोषाध्यक्ष शरद शिंदे या शिक्षक आघाडीच्या प्रतिनिधींनी या मोर्चाला भाजपा शिक्षक आघाडीचा सर्वार्थाने पाठिंबा असल्याचे पत्र संघर्ष समितीला दिलेले आहे.
याबरोबरच आझाद मैदानावर ही खांद्याला खांदा लावून आम्ही आपल्या सोबत आहोत तसेही प्रदेश सहसंयोजक विकास पाटील यांनी आश्वासन देऊन आश्वस्त केले. शिक्षकांच्या हितासाठी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी भाजपा शिक्षक आघाडी ही सदैव आपल्या सोबत असून आपल्याला सर्व माध्यमातून पाठिंबा मिळवून देण्यासाठी सुद्धा आग्रही राहून आपल्याला सहकार्य करू असे सांगितले. महाराष्ट्रातील शिक्षकांना जुनी पेन्शन हक्क मिळवण्यासाठी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेस भाजप शिक्षक आघाडीतर्फे सक्रिय पाठिंबा देण्यात येत आहे. सर्व शिक्षकांना पेन्शन योजना लागू व्हावी अशीच भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीची धारणा आहे असे विकास पाटील यांनी सांगितले.
0 Comments