"जे" व "ग" प्रभागात प्रतिबंधीत प्लस्टिक पिशव्या जप्तीची धडक कारवाई


कल्याण , प्रतिनिधी :  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या   "जे"  व " ग" प्रभागात गुरुवारी प्रतिबंधीत प्लास्टिक पिशव्या जप्तीची कारवाई दुकानदारावर करण्यात आली.  जे" प्रभागातील   कोळसेवाडी  यु टाईप  रोड, दरम्यानच्या अशोक फूट वेयर, आझाद बेकरी, पानेरी सिल्क,जगदंब सुपर मार्केट,  या दुकानच्या पाहणी दरम्यान  केलेल्या कारवाईत ३७ किलो प्लास्टिक पिशव्या प्रशासनाने जप्त केल्या.  या कारवाईत श्री गणेश हाँटेल कडून ५००० रू.दंड वसूल करण्यात आला. 


                       "जे" प्रभागक्षेत्र येथे प्रतिबंधीत प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्याची धडक कारवाई   जे प्रभागाच्या  सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी  प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक  एल.के.पाटील, आरोग्य निरीक्षक मोहन दिघे, अमित भालेराव,  राजेंद्र खैरे आणि अनधिकृत विभागाचे कर्मचारी यांचे समवेत  केली.  


            मनपाच्या " ग" प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी आरोग्य निरिक्षक प्रसाद पुजारे, सुर्वे यांच्या सह  डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रोड समर्थ मेडिकल स्टोर मधुन ५  किलो प्रतिबंधीत प्लास्टिक पिशव्या जप्त करीत ५००० रू दंडात्मक वसूल केले. प्रशासनाच्या प्रतिबंधीत प्लास्टिक पिशव्या जप्तीच्या कारवाई मुळे प्रतिबंधीत प्लास्टिक पिशव्या बाळगणार्या दुकानदाराचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments