मंत्री आले...पालिकेने स्टेशन बाहेरील फेरीवाले हटवले ...


डोंबिवली ( शंकर जाधव ) स्टेशन बाहेरील १०० मीटरच्या आत फेरीवाल्यांना बसल्यास मनाई आदेश आहे.या आदेशानुसार फेरीवाल्यांवर कारवाई केली नसल्याने पालिका आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी एका अधिकाऱ्याला निलंबित केले होते.मात्र त्यानंतरही डोंबिवली स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्यास 'ग' आणि 'फ' प्रभागाचे सहायक उपायुक्त भरत पाटील आणि रत्नप्रभा कांबळे यांनी यश आले नाही.


         फेरीवाला अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही अनाधिकृत फेरीवाल्यांना मोकळे रान देत असल्याचे दिसते.शुक्रवारी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी येणार असल्याने  सायंकाळी स्टेशनबाहेरील  परिसरा फेरीवाले हटविण्यात आले.मंत्री आले की त्यादिवसापूरते स्टेशनपरिसर फेरीवाला मुक्त केला जातो.


         त्यानंतर 'पुन्हा ये रे माझ्या मागल्या'प्रमाणे फेरीवाल्यांना आंदण दिले जाते.पालिकेच्या या खेळात जनतेला मात्र नाहक त्रास क सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments