पवार दांम्पत्याची कुष्टरुग्ण वसाहती मध्ये मदत


कल्याण , प्रतिनिधी :  लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशांत पवार आणि सोनल सावंत पवार या दांपत्याने कल्याण मधील हनुमान नगर येथील कुष्ठरूग्ण वसाहतीतील पाच कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.


         प्रत्येक जण वाढदिवस वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करतात पण या दांपत्याने सामाजिक बांधिलकी जपत वेगळ्या प्रकारे आपला लग्नाचा वाढदिवस साजरा केला. येथील नागरिकांच्या चेहर्यावरील आनंद पाहून समाधान मिळाल्याची भावना यावेळी पवार दांपत्याने व्यक्त केली. यावेळी कुष्ठरूग्ण वसाहतीची कमिटी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments