इन्फिनिक्सचा भारतातील लॅपटॉप बाजार पेठेत प्रवेश

■३५९९९ रूपये या सुरूवातीच्या किंमतीमध्ये स्लिम व आकर्षक इनबुक एक्स१ सिरीज लाँच ~


मुंबई, १० डिसेंबर २०२१ : ट्रांसियन ग्रुपचा प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्ड इन्फिनिक्सने भारताचे स्वदेशी ई-कॉमर्स बाजारस्थळ फ्लिपकार्टवर क्रांतिकारी इनबुक एक्स१ सिरीज लॅपटॉप लाँच करत लॅपटॉप क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. घोषणा केल्यापासून चर्चेत असलेला लॅपटॉप आधुनिक विंडोज ११ इंटेल कोअर डिवाईस आहे, जो तीन प्रोसेसर आय३ (८ जीबी + २५६ जीबी), आय५ (८ जीबी + ५१२ जीबी), आय७ (१६ जीबी + ५१२ जीबी) व्हेरिएण्ट्समध्ये येईल.


       नवीनच लाँच करण्यात आलेल्या इनबुक एक्स१ मध्ये नेहमीच व्यस्त असलेले तरूण श्रमजीवी व्यावसायिक व विद्यार्थ्यांसाठी वजनाने हलका, प्रबळ बॅटरी क्षमता व उच्च दर्जाच्या कार्यक्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे. हे लॅपटॉप्स १५ डिसेंबरपासून ३५,९९९ रूपये (आय३), ४५,९९९ रूपये (आय५) आणि ५५,९९९ रूपये (आय७) या सुरूवातीच्या किंमतींमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.


     इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष कपूर म्हणाले, "आमच्या नवीन इन्फिनिक्स इनबुकसह आमचा ग्राहकांना असे उत्पादन देण्याचा प्रयत्न आहे, जो त्यांच्या बहुकार्यक्षम गरजांची पूर्तता करण्यासोबत उच्च व्हिज्युअल व प्रोसेसिंग दर्जाची खात्री देखील देईल आणि त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक गरजांची पूर्तता करेल. या प्रयत्नामध्ये आम्हाला फ्लिपकार्टसोबत सहयोग करण्याचा आणि जवळपास अर्ध दशकापूर्वी मोबाइल्ससह सुरू झालेला दीर्घकालीन सहयोग अधिक पुढे घेऊन जाण्याचा आनंद होत आहे.”


     अल्ट्रा-लाइट, पोर्टेबल व स्लीक डिझाइन: या लॅपटॉप्सची ऑल-मेटल बॉडी टिकाऊ एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनिअम फिनिशसह डिझाइन करण्यात आली आहे. या लॅपटॅापचे वजन फक्त १.४८ किग्रॅ आणि जाडी १६.३ मिमी आहे. ज्यामुळे हा किफायतशीर दर असलेल्या विभागामधील सर्वात सडपातळ व वजनाने सर्वात हलका लॅपटॉप आहे. युजर्सना सोईस्करपणे काम करण्याची सुविधा देणा-या या लॅपटॉपमध्ये १४-इंच फुल एचडी आयपीएस डिस्प्लेसह १८०-अंश व्युईंग अँगल आहे. इनबुक एक्स१ लॅपटॉप नोबल रेड, स्टारफॉल ग्रे आणि अरोरा ग्रीन अशा तीन प्रिमिअम व आकर्षक रंगांमध्ये येतो.


     शक्तिशाली बॅटरी: ५५ डब्ल्यूएच उच्च-क्षमतेची बॅटरी असलेली इन्फिनिक्स इनबुक एक्स१ सिरीज जवळपास १३ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देते. या बॅटरीला ६५ वॅट फास्‍ट टाइप-सी चार्जरचे पाठबळ आहे, जो ५५ मिनिटांमध्ये लॅपटॉपला जवळपास ७० टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतो. हा लॅपटॉप मल्टी-युटिलिटी चार्जरसह येतो, जो लॅपटॉप व स्मार्टफोनला चार्ज करू शकतो.


      पॉवर-पॅक कार्यक्षमता: इन्फिनिक्स इनबुकमध्ये आधुनिक इंटेल कोअर प्रोसेसर – आय३/आय५/आय७ ची शक्ती आहे आणि विंडोज ११ प्री-इन्स्टॉल केलेले आहे. इन्फिनिक्स इनबुक आय७ प्रोसेसर व्हेरिएण्टमध्ये इंटेल आईस लेक कोअर आय७ चिपसेट आहे, जी अत्यंत गतीशील कार्यक्षमतेची खात्री देते. तिन्ही लॅपटॉप्समध्ये आईस स्टॉर्म १.० कूलिंग सिस्टिम इन्स्टॉल केलेली आहे, जी दीर्घकाळापर्यंत वापर केल्यानंतर देखील लॅपटॉपचे तापमान कमी ठेवते. इन्फिनिक्स इनबुक एक्स१ च्या आय३ व आय५ व्हेरिएण्ट्समध्ये इंटेल यूएचडी ग्राफिक्स युनिट आहे, तर आय७ मध्ये जवळपास ६४ ईयू ग्राफिक्स युनिटपर्यंतचे प्रगत, एकीकृत आयरिस प्लस आहे. आय३ व आय५ या दोन्ही व्हेरिएण्ट्समध्ये ड्युअल-चॅनेल मेमरीसह ८ जीबी डीडीआर४एक्स रॅम आहे, तर आय७ व्हेरिएण्टमध्ये १६ जीबी डीडीआर४एक्स रॅम आहे.


       कनेक्टीव्हीटी: लॅपटॉप्सच्या माध्यमातून रिमोट वर्किंग प्रक्रिया एकसंधी व सुलभ करण्यासाठी पुरेशा पोर्टसची गरज असते, जे सर्व अॅक्सेसरीजशी कनेक्ट होऊन काम पूर्ण करू शकतात. इन्फिनिक्स इनबुक एक्स१ सिरीजच्या तिन्ही व्हेरिएण्ट्समध्ये विविध कनेक्टीव्हीटी पोर्ट्स आहेत, जसे एक यूएसबी २.० पोर्ट व २ यूएसबी ३.० पोर्ट्स, स्मार्टफोन चार्जिंग व डेटा ट्रान्सफरसाठी एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, लॅपटॉप चार्जिंग व डेटा ट्रान्सफरसाठी एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, मायक्रो-एसडी कार्ड रीडर, डीसी चार्जिंग पोर्ट आणि २-इन-१ हेडफोन व माइक कॉम्बो जॅक.


     आय३ व आय५ या दोन्ही व्हेरिएण्ट्समध्ये वायफाय ५ इन्स्टॉल केलेले आहे, तर आय७ व्हेरिएण्टमध्ये बिल्ट-इन वायफाय ६ आहे. ज्यामुळे डाऊनलोडिंग स्पीड इतर व्हेरिएण्ट्सपेक्षा ३ पटीने गतीशील आहे.

Post a Comment

0 Comments