कल्याणच्या रेल्वे स्थानक परिसरातील घटना महिलेच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पकडले


डोंबिवली  ( शंकर जाधव ) सोन्याची चेन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही घटना कल्याणच्या रेल्वे स्टेशन परिसरात घडली. उमाशंकर पांडे असे या चोरट्याचे नाव असून त्याच्याविरोधात कल्याणच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


     उल्हासनगरमध्ये राहणारी वॉल्समा जॉर्ज ही महिला दुपारच्या सुमारास रेल्वे ट्रॅकच्या समांतर असलेल्या रस्त्यावरून जात होती. इतक्यात एका चोरट्याने पाठलाग वॉल्समाच्या गळ्यातील महागडी चेन हिसकावून पळ काढला. वॉल्समा यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांच्या मदतीने या चोरट्याला पकडून कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.    या संदर्भात पोनि अर्चना दुसाने यांनी पांडे विरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. त्याच्या विरोधात यापूर्वी देखील अशा पद्धतीचा एक गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्याने अशाप्रकारचे आणखी किती गुन्हे केले आहेत याची पोलिस सखोल चौकशी करत आहेत. 

Post a Comment

0 Comments