कल्याण जवळील द्वारली गावात चोरट्या महिलांचा सुळसुळाट चोरी करताना महिला सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण जवळील द्वारली गावात चोरट्या महिलांचा सुळसुळाट झाला आहे. महिलांनी दुकानदारांना गोंधळून दुकानांमधील साहित्य घेऊन पोबारा करत असल्याची घटना समोर आली असून याचे सीसीटीव्ही आता समोर आले आहे. या प्रकरणी  पोलीस ठाण्यात दुकानदाराने तक्रार दाखल कारण्यासाठी धाव घेतली आहे. 


डोंबिवलीकल्याण  या शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात  सुद्धा आता चोऱ्या होऊ लागल्या आहेत. कल्याण जवळील द्वारली गावातील गुरुनाथ पावशे यांच्या गावदेवी स्टील मार्ट मधून शेगड्या घेऊन महिला चोरटयांनी पोबारा केला आहे. महिलांची पाच जणींची टोळी असल्याचे दुकानदार याचे म्हणणे आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळं आता पोलिसांना या महिला चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे. 


 द्वारली गावात या आधीही जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या एका दुकानामधून खाद्य तेलासह अन्य साहित्य घेऊन एका चोरट्याने पोबारा केला होता. आता द्वारली गावात पुन्हा एकदा महिला चोरट्या टीम ग्रामीण भागात सक्रिय झाली आहे.      

Post a Comment

0 Comments