क्रॉम्‍प्‍टनच्‍या नवीन इन्‍स्‍टा फर्वर ऑईल-फिल्ड रूम हिटर्ससह हिवाळ्याच्‍या गारव्‍यापासून आराम मिळवामुंबई, १४ डिसेंबर २०२१ : हिवाळा ऋतू सुरू होण्‍यासोबत भारतातील आघाडीचा ग्राहक इलेक्ट्रिकल ब्रॅण्‍ड क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लिमिटेडने इन्‍स्‍टा फर्वर ऑईल-फिल रूम हिटर्स या नवीन श्रेणीच्‍या लाँचसह रूम हिटर विभागामध्‍ये प्रवेशाची घोषणा केली आहे. कोणत्‍याही रूमच्‍या लुकमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करणा-या लक्षवेधक स्‍टाइल व डिझाइनने युक्‍त क्रॉम्‍प्‍टनची नवीन रूम हिटर्स श्रेणी परिसरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करत नाही, ज्‍यामुळे श्‍वास गुदमरणे किंवा त्‍वचा कोरडी पडणे अशा गोष्‍टींना प्रतिबंध होण्‍यासोब‍त थंड हिवाळ्यामध्‍ये उबदार व आरामदायी वातावरणाची खात्री मिळते.


            धगधगत्‍या गरमीपासून आराम मिळत असला तरी कडाक्‍याची थंडी आव्‍हानात्‍मक ठरू शकते. प्रत्‍येकजण उबदारपणासाठी विभिन्‍न मार्गांचा अवलंब करत असतात. रूम हिटर्स विशेषत: खूप थंडी असताना सर्वात लाभदायी अप्‍लायन्‍स ठरू शकते. तापमान कमी असताना रूममध्‍ये उबदारपणा निर्माण करण्‍यासाठी ओळखले जाणारे कंवेक्‍शन किंवा रॅडियण्‍ट रूम हिटर्स अनेकदा उष्‍णतेचे माध्‍यम म्‍हणून ऑक्सिजनचा वापर करतात, ज्‍यामुळे श्‍वास गुदमरणे व त्‍वचा कोरडी पडणे अशा विविध समस्‍या निर्माण होतात. 


         अशा समस्‍यांना प्रतिबंध करण्‍यासाठी क्रॉम्‍प्‍टनचे आधुनिक इन्‍स्‍टा फर्वर ऑईल-‍फिल रूम हिटर्स उत्तम मूल्‍य तत्त्व देतात. हा आकर्षक सायलण्‍ट रूम हिटर कार्यक्षम व प्रभावी आहे. तो उष्‍णतेचे माध्‍यम म्‍हणून तेलाचा वापर करतो, ज्‍यामधून खोलीच्‍या कानाकोप-यापर्यंत उबदारपणा पसरण्‍याची खात्री मिळते.


            संपूर्ण कुटुंबासाठी उबदारपणाचे माध्‍यम म्‍हणून शेकोटीसाठी योग्‍य रिप्‍लेसमेंट असलेल्‍या क्रॉम्‍प्‍टनच्‍या इन्‍स्‍टा फर्वर ऑईल-फिल रूम हिटर्समध्‍ये कार्यक्षमता, आकर्षकता व नवोन्‍मेष्‍काराचे उत्तम संयोजन आहे. शांत कार्यसंचालन आणि संपूर्ण खोलीमध्‍ये एकसमान हिटिंग देण्‍यासोबत या श्रेणीचे इतर फायदे खाली देण्‍यात आले आहेत:  


थ्री हिट सेटिंगसह अॅडजस्‍टेबल थर्मोस्‍टॅट – खोलीतील तापमान इच्छित पातळीनुसार राखण्‍यास मदत करते.


अॅम्बियण्‍ट टेम्‍परेचर – आसपासच्‍या तापमानावर देखरेख ठेवते. इच्छित तापमान स्‍थापित केल्‍यानंतर आसपासचे तापमान कमी झाले तर रूम हिटर त्‍याअनुषंगाने समायोजित होईल आणि खोलीमधील हिटिंग वाढवेल.


टिल्‍ट ओव्‍हर प्रोटेक्‍शन – हिटर नकळतपणे खाली पडला, तर आपोआपपणे बंद होईल. ओव्‍हर हिट प्रोटेक्‍शन – ओव्‍हर-हिटिंग झाल्‍यास आपोपपणे बंद होतो आणि हिटरचे नुकसानापासून संरक्षण करते. क्विक हिटिंगसह ४०० वॅट पीटीसी हिटिंग घटक


        वेव्‍ह फिन्‍स, जे जलदपणे मोठ्या पृष्‍ठभागांना / रूम्‍सना उबदार करते आणि ९ फिन्‍स, ११ फिन्‍स व १३ फिन्‍समध्‍ये येते. 

मॉडेल

वॅट क्षमता

किंमत एमआरपीमध्‍ये

इन्‍स्‍टा फर्वर ९

२४०० वॅट

१४,८००

इन्‍स्‍टा फर्वर ११

२९०० वॅट

१६,८००

इन्‍स्‍टा फर्वर १३

२९०० वॅट

१८,२००


        हा हिटर भारतातील बाजारपेठांमध्‍ये, तसेच ईकॉमर्सवर उपलब्‍ध आहे.


          कंपनीच्‍या या आधुनिक नवोन्‍मेष्‍काराबाबत सांगताना क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.च्‍या अप्‍लायन्‍स बिझनेसचे उपाध्‍यक्ष श्री. सचिन फर्तियाल म्‍हणाले, ''क्रॉम्‍प्‍टनने घराच्या प्रत्‍येक टचपॉइण्‍टच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आधुनिक आकर्षकतेने युक्‍त नवोन्‍मेष्‍कार सादर करण्‍याचा नेहमीच प्रयत्‍न केला आहे. आज आमच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये सर्व ऋतूंमध्‍ये आरामदायीपणाची खात्री देणा-या उत्‍पादनांच्‍या श्रेणीचा समावेश आहे. 


          विशेषत: देशाच्‍या थंड भागांमध्‍ये रूम हिटर्सचा अधिक प्रमाणात होत असलेला वापर पाहता आमची मुलभूत गरजांची पूर्तता करण्‍यासोबत ग्राहकांचे आरोग्‍य व सुरक्षिततेला प्राधान्‍य देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले उत्‍पादन सादर करण्‍याची इच्‍छा होती. आमचे नवीन इन्‍स्‍टा फर्वर ऑईल-फिल रूम हिटर्स थंडाव्‍यापासून त्‍वरित आराम व उबदारपणा देतात, तसेच त्‍यामधील ऑक्सिजन कमी होणे व त्‍वचा कोरडी पडणे अशा समस्‍यांना प्रतिबंध करणारी प्रमुख वैशिष्‍ट्ये आरोग्‍यदायी वातावरण निर्माण करतात. 


          उबदारपणा व आरामदायीपणाचे अद्वितीय संयोजन सादर करत आम्‍हाला विश्‍वास आहे की, रूम हिटर्सची ही नवीन / नवोन्‍मेष्‍कारी श्रेणी दीर्घकालीन व सर्वोत्तम हिटिंग कार्यक्षमतेची, तसेच हिवाळ्यातील सर्व चिंता दूर करत व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍याच्‍या सुरक्षिततेची खात्री देईल.''

Post a Comment

0 Comments