टिटवाळ्यात गॅसच्या भडक्यात भाजल्याने कर्मचारी जखमीकल्याण  , कुणाल  म्हात्रे :   टिटवाळा पुर्वेत   गॅस लिकेजच्या तक्रारीवरून  गॅस दुरुस्त करण्यासाठी आलेला गँस् एजन्सी तील कर्मचारी काम करत असताना या गॅसने अचानक पेट घेतल्याने दिलीप हरड हा कर्मचारी भाजल्याची घटना टिटवाळा स्टेशन परिसरात घडली आहे.       

 
       जखमी कर्मचार्यावर महागणपती रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. तर अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी राजू यांच्या घरातील पंखे, फर्निचर या आगीत जळाल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.  


        टिटवाळा स्टेशन नजीक परिसरातील  गणेश दर्शन अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या नागो कृष्णराव राजू यांच्या घरातील शनिवारी दुपारी एचपी कंपनीचा  गॅस लिकेज झाल्यामुळे त्यांनी कंपनीच्या अधिकृत मोबाईलवर तक्रार केली. यानंतर काही वेळातच कंपनीचा कर्मचारी दिलीप हरड (५०) हा दाखल झाला. तो गॅसचा रेग्युलेटर काढून दुरुस्त करत असताना काही प्रमाणात सिलेंडर मधून गॅस बाहेर पडला. 


        दुर्दैवाने यावेळी स्वयंपाकघरातील देवघरात दिवा तेवत असल्याने गॅसने पेट घेतल्याने भडका उडाला. अचानक लागलेल्या या आगीत हरड यांचे दोन्ही हात भाजले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अग्निशमन विभागाने तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले तर एचपी कंपनीकडून सदरचा सिलेंडर ताब्यात घेण्यात आल्याचे अग्निशमन अधिकारी सुधीर डुशींग यांनी संपर्क साधला असता सांगितले.

Post a Comment

0 Comments