जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भिवंडीतुन शेकडो कर्मचाऱ्यांचा विधिमंडळाच्या दिशेने लॉंगमार्च...


भिवंडी , प्रतिनिधी  ; राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती च्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील  पडघा ते विधिमंडळा  पर्यंत पायी लॉंगमार्च कडून शासनाचे आपल्या मागण्यां कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे .सन 2005 पासून शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे .


        त्यामुळे हजारो शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवरीत्ती वेतन मिळत नसल्याने वृद्धपकाळात त्यांच्यावर अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ येणार असल्याने शासनाने या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये अशी मागणी या आंदोलनकर्त्यांच्या समितीचे समन्वयक नितेश खांडेकर यांनी केली असून आता पर्यंत चार हजार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे .


         त्याचा रोष विविध शासकीय कर्मचाऱ्यां मध्ये असल्याने त्याला न्याय मागण्यासाठी हा निर्वाणीचा लढा उभारण्यासाठी सुरू झालेला  लॉंगमार्च 24 डिसेंबर रोजी विधिमंडळावर धडकणार असल्याचे स्पष्ट केले .


       जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती मध्ये महसूल ,आरोग्य, शिक्षण या सह विविध विभागातील तब्बल शंभर हुन अधिक संघटना या मध्ये सहभागी असून पडघा येथून सुरू झालेला लॉंगमार्च मंगळवारी भिवंडीत मुक्कामी असून उद्या ठाणे मुक्कामी थांबून पुढे मुंबई कडे कूच करणार असून या लॉंगमार्च मध्ये सुमारे 500 कर्मचारी सहभागी असून पुढे ही संख्या वाढणार आहे अशी माहिती समन्वयक वितेश खांडेकर यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments