माझी वसुंधरा अभियानां तर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

■ठाणे महापालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अभियानां तर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेची छायाचित्रे.  


ठाणे , प्रतिनिधी  : शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत ठाणे महापालिकेच्यावतीने ६ ते १० वर्षे व  ११ ते १४ वर्षे या दोन वयोगटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


     माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत खारेगाव तलाव, उपवन तलाव, कचराळी तलाव व आंबेघोसाळे तलाव या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


      या चित्रकला स्पर्धेसाठी प्रदूषण मुक्त शहर, माझी वसुंधरा माझी जबाबदारी, प्लास्टिक बंदी असे विषय देण्यात आले होते. कोव्हिड-१९ च्या नियमांचे पालन करुन पार पडलेल्या या सर्व चित्रकला स्पर्धेला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेदरम्यान उपस्थितांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. या स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांना प्रत्येक गटातून एकूण ५ बक्षिसे देण्यात येणार असून त्यांची पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments