जाणता प्रतिष्ठाणच्या वतीने अनाथ मुलामुलींची आरोग्य तपासणी


कल्याण, प्रतिनिधी  : जाणता प्रतिष्ठान या संस्थेमार्फत जिवनसंवर्धन या अनाथ आश्रमातील ७० मुलामुलींची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले.


 राष्ट्राची भावी पिढी सशक्त राहावी या उद्देशाने दिव्यांग दिनाच्या निमित्ताने हे आरोग्य शीबीर टिटवाळा  येथे राबविण्यात आले. सर्व मुलांची आरोग्य तपासणी करून औषधी आणि टॉनिक्स ही देण्यात आले. शिबिरादरम्यान अनेक मुलामुलींनी गाणी ही म्हणून दाखविली, तसेच समाजातील  मुलांच्याही सहवासात राहून आपल्या मुलाचा प्रथम वाढदिवस साजरा करणे असा विचार करून धीरज घागरे यांनी त्या सर्व मुलांना गोडाधोडाचे जेवण,फळे,आणि  संध्याकाळी केक कापून शारविल याचा वाढदिवस आनंदी,प्रसन्न ,नैसर्गिक वातावरणात साजरा केला.


यावेळी जाणताचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर ताम्हणकर, सचिव राम चौहान, महिला अध्यक्षा ललिता मोरे, आरोग्यविभाग प्रमुख डॉ.शोभा पाटील, सदस्य भूषण पांडे, कविता महाले, ज्ञानेश्वरी, धीरज घागरे आणी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments