पालिकेच्या आठवडा बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद


कल्याण , प्रतिनिधी  :  श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि., ग्रोवर्स डायरेक्ट इंडिया लिमिटेड आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास उत्तम प्रतिसाद मिळाला. या आठवडी बाजारासाठी मुंबई विद्यापीठाच्या मागेउद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हा बाजार भरविण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली होती. शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला आणि फळे थेट ग्राहकांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.


       या आठवडी बाजाराचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी स्वतः आठवडी बाजाराची पाहणी करून आयोजकांचे कौतुक केले.  यावेळी उप अभियंता जगदीश कोरेशमीम केदार कनिष्ठ अभियंता दिलीप शिंदे आणि ब प्रभागाचे सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप व आयोजक नरेंद्र पवार उपस्थित होते. या आठवडी बाजाराला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता यापुढे दर रविवारी या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Post a Comment

0 Comments