दिव्य काशी, भव्य काशी' कार्यक्रमाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप तर्फे थेट प्रक्षेपण व आनंदोत्सव


कल्याण , प्रतिनिधी  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील विकास कामांच्या व काशी विश्वनाथ धाम लोकार्पणा निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे 'दिव्य काशीभव्य काशी" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, माजी आमदार तथा भटके विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, आमदार डॉ. राहुल आहेर,जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी,जिल्हा सघटन सरचिटणीस सुनील बच्छाव,नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकरशहराध्यक्ष सुयोग वाडेकर,भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष रविंद्र गांगुले,तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे, मा.शहराध्यक्ष शाम गंगापुत्र,आखाडा परिषदेचे साधु-महंत व धर्माचार्ययांची प्रमुख उपस्थितीती याप्रसंगी होती.


आद्यज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रमुख अतिथी व साधुमहंतांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक पुजन करून यावेळी आरती करण्यात आली. पौरोहित्य उपेंद्र शिखरेरतिश जोशी,चंद्रकांत अकोलकर यांनी केले. सनातन धर्मासाठी हा ऐतिहासिक क्षण असुन भारतामधील सर्व पौराणिक वास्तूंना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत आहे अशी भावना यावेळी उपस्थित साधु-महंत व धर्माचार्यांनी व्यक्त केली. यावेळी त्र्यंबकेश्वर भाजपा तर्फे उपस्थित सर्व मान्यवर व साधुसंतांचा सन्मान करण्यात आला. काशी विश्वनाथ धामचे लोकार्पणाचा भव्य दिव्य कार्यक्रमा मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करून सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

Post a Comment

0 Comments