मालमत्ता करा संबंधीच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ११४ मिळकत धारकांनी मांडल्या तक्रारी

■५७ मिळकत धारकांना दिली मालमत्ता कराची सुधारीत देयके...


कल्याण , प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या मालमत्ता करासंबंधीच्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात  ११४ मिळकतधारकांनी तक्रारी मांडल्या. यापैकी ५७ मिळकत धारकांना मालमत्ता कराची सुधारीत देयके देण्यात आली.


‘‘नागरीकांना सेवाभावाने आणि तत्परतेने सेवा दिल्यास संविधानाची मुल्ये खऱ्या अर्थाने जोपासली जातील’’, या महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी संविधान दिनानिमित्त सर्व अधिकारी  कर्मचारी यांना केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व संकलन विभागामार्फत ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत ई प्रभागक्षेत्र कार्यालयातडोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग व इंडस्ट्रीयल झोनमधील मिळकतधारकांचे मालमत्ता करासंबंधी तक्रारीचे निवारण करण्याकरीता ३ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिरात एकूण ११४ मिळकतधारकांनी समक्ष येऊन आपल्या तक्रारी मांडल्या. तक्रारींची शहानिशा करून सर्वसाधारण सभेने ठराव क्र.११ दि ६-११-२०२० अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार सन २००२ पूर्वीच्या मिळकतीत बदल नसल्यास सन २००२ पूर्वीचे करयोग्य मुल्य निश्चित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच सन २००२  नंतरच्या मिळकतींमधील क्षेत्रफळातील दुरूस्तीनुसार सुधारीत करयोग्य मुल्य निश्चित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला व एकुण ५७ मिळकत धारकांस मालमत्ता कराची सुधारीत देयके देण्यात आली.


करदात्यांनी या शिबिरास उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला असुन याबद्दल सकारात्मक अभिप्राय नोंदवुनशिबिर यशस्वी करणारे कर विभागाचे प्र.सहा.आयुक्त प्रदिप विशे व प्र.उप आयुक्त विनय कुळकर्णी यांचे मनापासुन कौतुक केले आहे. २७ गांवातील तक्रार निवारणाचे कामकाज शिबिरापुरते मर्यादित राहणार नसुन करदात्यांच्या काहीही समस्या असल्यास करदात्यांनी कर विभागाचे प्र.उप आयुक्त विनय कुळकर्णी यांच्यशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments