कल्याण शिळ रस्त्याचे काम राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या गर्तेत

■रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी होतेय वाहतूक कोंडी..


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण - शीळ रस्त्याच्या कामाला गती मिळत नाही.   शीळ फाटा  पालवा जंक्शन पर्यंत रस्त्याचे क्राँक्रीटकरण काम पूर्णात्वाकडे गेले असले तरी राजकीय कलगीतुरा मध्ये रस्त्याचे काम संथ गतीने होत असून रस्त्याच्या कामाच्या दर्जा बाबत आरोप प्रत्याआरोपामुळे कल्याण - शीळ रस्त्याच्या विषयाच्या खमंग  राजकीय चर्चा रगंल्या आहेत.   


एमएसआरडीसीच्या माध्यमातून तीन टप्प्यात कल्याण शीळ रस्त्याचे सुमारे ६०० कोटी अपेक्षित खर्चाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु असुन शीळ फाटा ते पलावा जंक्शन काँक्रीटीकरणाचे ३किमी काम पूर्णात्वाकडे गेले असुन  काटई - मानपाडा जंक्शन सुमारे ३ किमीचे काम सुरू असून मानपाडा -पत्रीपुल ६ किमी  देखील वनसाईड सुरु असुन पत्रीपुल परिसरात काँक्रीटीकरण रस्त्याचे मार्गी लागले आहे. 


कल्याण शहर परिसरात अड्डीच किमी लांबीचे काम शिल्लक असून दुर्गाडी - राजनोली  ब्रीज ५किमी लांबीचे काँक्रीटीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून गेली दोन वर्षापासून सुरू असलेल्या कल्याण शीळ रस्त्याच्या काम तसेच होणारी वाहतूक कोंडी प्रवाशी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत असते.


 कोरोना पार्श्वभूमीचा लाँकडाऊन  फटकातंत्रिक बाबीमुळे संर्दभीत रस्त्याच्या पाहिजे तेवढी  गती मिळू शकली नाही. तसेच  मार्च २०२२ ही रस्त्याच्या कामाची अंतिम मुदत असल्याने प्रशासन रस्त्याचे काम पूर्णात्वाकडे जाण्यासाठी जोर धरू पाहत आहे. रस्त्याच्या  कामाचा दर्जा निकुष्ट असल्याबाबत आरोप होत असल्याने याबाबत मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,व्हीजेटीआय् मार्फत कामाच्या गुणवत्ता चाचणी करण्यात आली असून रस्त्याच्या कामाचा दर्जा सामाधान कारक असल्याचा अवहाल आहे. 


तसेच रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला काही ठिकाणी तडे पडल्या संदर्भात अशा पँनलची रिकाँस्ट करून संदर्भीत ठेकेदाराकडून करून घेत आहोत.  कल्याण शीळ रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असुन एकंदरीत पाहता रस्त्याचे काम राजकीय आरोप प्रत्याआरोपामुळे चर्चेच्या फेर्यामुळे चर्चेत असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

Post a Comment

0 Comments