आरएसपी कमांडर मनिलाल शिंपी "जीवन गौरव २०२१" पुरस्काराने सन्मानित

■केंद्रीय मानव एकाधिकार संघटन तर्फे नागपूर येथे पुरस्कार प्रदान..


कल्याण , प्रतिनिधी  : आर. एस.पी कल्याण, ठाणे यूनिटचे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांना नुकताच महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भारत ओडिसा भुवनेश्वर युनिव्हर्सिटी यांनी महाराष्ट्राचे राजदुत म्हणून नियुक्ति केल्या बद्दल त्यांचा  राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्माननीय भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते  स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाची दखल घेऊन केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्ली यांच्या वतीने मानव अधिकार दिवसाचे औचित्य साधून नागपूर येथे "जीवन गौरव २०२१" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


नागपूर न्यायाधीश अभिजित देशमुख, नागपूर वरिष्ठ पोलीस अधीक्षक  संजय पांडे, चित्रपट निर्माते दिपक कदम, अभिनेत्री अश्विनी चंद्रकापुरे केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिद दहीवले यांच्या उपस्थितित मनिलाल शिंपी यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

Post a Comment

0 Comments