काळू, उल्हास नदीचे प्रदूषण कमी होण्यासाठी केडीएमसीचा अँक्शन प्लॅन

 


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रात काळूउल्हास नद्या या बारावे जंक्शन जवळ कल्याण खाडीला येऊन मिळतात. काळू आणि उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने नदी प्रादुषणाचा प्रश्न अनेक वर्षापासून लावून धरला जात आहे. कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रासह, एमआयडीसीजीवनप्राधिकरणठाणे मनपा आदी उल्हासनदी मोहने बांधरा उल्हास नदी पत्रातुन कोट्यवधी जनतेची तहान भागविण्यासाठी पाणी उचलत आहेत.  


        उल्हास नदीत या परिसरात नाल्यामधून होणारे सांडपाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत योजने अंतर्गत मल सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम हाती घेतले. हे काम अंतिम टप्प्यात असून ही योजना मे२०२२ र्पयत पूर्णपणे कार्यान्वीत होणार आहे. मे महिन्यात नदीचे प्रदूषण कमी होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.


उल्हासनदी पात्रात महापालिका हद्दीतील मोहने येथील महात्मा फुलेनगरयादवनगर परिसरातील नाल्यांद्वारे येणारे सांडपाणी प्रक्रिया न करता मिसळले जात होते. हा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यावर सांडपाणी प्रक्रिया करुन सोडले जाईल. मोहने येथील दोन नाल्यावर ग्याबिन पध्दतीचे तीन बंधारे बांधले असुन यामाध्यामतुन सांडपाण्यावर प्रक्रिया करीत पाण्याचे प्रदूषण टाळले जाणार आहे.                


  तसेच काळू नदीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आंबिवली पश्चिमेतील नेपच्यूनबी.के. पेपर मिलसंतोषीमातानगर (मानी)अटाळी येथील नाला असे ३ नाले नदी पात्रत येऊन मिळत होते. या ३ नाल्यातील सांडपाणी प्रक्रिया करुन सोडले जाणार आहे.


महापालिका मल प्रक्रियेची योजना दोन टप्प्यात राबवित आहे. दुस:या टप्प्याच्या योजनेस २०१८ मध्ये मंजूरी मिळाली. दुसरा टप्पा १३२ कोटी रुपये८२ लाख रुपये खर्चाचा होता. या योजनेचे जानेवारी २०२० पर्यंत केवळ २० टक्केच काम झाले होते. कोविड काळ असताना देखील योजनेचे काम आत्तार्पयत ८५ टक्के पूर्ण झाले आहे. आत्तार्पयत ११ पैकी ८ पपिंग स्टेशन बांधून पूर्ण झालेली आहेत.


 नोव्हेंबर २०२१ पर्यंत या योजनेच्या कामावर १०३ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. दुसरा टप्पा मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मार्गी लावल्यास काळू, उल्हास नद्यांचे होणारे सांडपाण्याचे प्रदूषण बंद होणार आहे. तसेच काळू उल्हासनदीतील जैवविविधता वाढीस मदत होईल. नद्यांच्या पाण्यातील पर्यावरण वाढ होईलजलपर्णीच्या वुध्दीस मदत होणार असल्याचे कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.


पहिला टप्पा हा १५३ कोटी ३८ लाख रुपये खर्चाचा होता. पहिल्या टप्प्यास २०१७ मध्ये मंजूरी मिळाली. जानेवारी २०२० पर्यंत पहिल्या टप्प्याचे काम ४० टक्के झाले होते. पहिल्या टप्प्या ११ पैकी १० पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. ४७ किलोमीटरच्या मलवाहिन्या टाकून झाल्या आहेत. केवळ ३ किलोमीटरचे काम बाकी आहे. ३० हजार मिळकती मलवाहिन्यांशी जोडल्या आहेत. जमीन संपादनाचे काही प्रश्न होते. ते मार्गी लावण्यात आले आहेत. आत्तापर्यंत योजनेच्या कामावर ११८ कोटी २५ लाख रुपये खर्च झाला आहे. योजनेचे काम आतापर्यंत ९० टक्के झाले आहे. हे कामही मे २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.


"उल्हास, काळू नदीत मनपाक्षेत्रातील थेट नाल्यामधील प्रक्रिया न करता येणाऱ्या सांडपाण्यावर आता प्रक्रिया होणार असल्याने उल्हासनदी काळूनदीच्या संदर्भीत परिसरातील प्रादूषणाची पातळीचा स्तर घटणार असल्याने आता उल्हासनदीतील जलसृष्टीत वाढ होणार असल्याने मासेमारीसाठी पर्वणी ठरणार आहे. तसेच काळू नदीचे प्रदूषण घटल्याने दुर्मिळ असा पाला माशांच्या वाढीस पोशक होईल असे यानिमित्ताने स्थानिक कोळीवाड्यातील मच्छीमार असलेल्या जाणकारांनी सांगितले."

Post a Comment

0 Comments