अनुभूती द्वारे चित्रकारांनी साकारला कलाविष्कार चार चित्रकारांच्या समूह चित्र प्रदर्शनाला आज पासून सुरवात


कल्याण, प्रतिनिधी  : चित्र म्हणजे दृक भाष्य शब्दा विना साधलेला संवाद असाच संवाद चित्र रसीकांसाठी अनुभूती या समूह चित्र प्रदर्शनातून  चित्रकार जयवंत वाघेरे (वाडा),  चित्रकार  प्रकाश काकड(कल्याण), ऋषभ झाला (ठाणे) व पालघर येथील धिरज पाटील या चित्रकांनी साधला आहे. रंग ,आकार यातुन आशयाची अनुभूती साकारली आहे. मुंबईतील नेहरू सेंटर येथे हे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले असून आजपासून या चित्रप्रदर्शनाला सुरवात झाली आहे. २७ डिसेंबर पर्यंत हे चित्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे.


            निसर्गचित्र ,  रचनाचित्र व अमूर्तचित्र अश्या चित्र प्रकारचे विषय या प्रदर्शनात  मांडन्यात आले आहेत. निसर्गाच्या विविध रुपात बदलणाऱ्या रंग छटांची अनुभूती चित्रकार जयवंत वाघेरे व प्रकाश काकड यांच्या चित्रातून साकारली आहे.  तर मानवी भावविश्वाच्या सुंदर अवस्थांची अनुभूती चित्रकार धिरज पाटील यांच्या रचनाचित्रा तून साकारली आहे. चित्रकार ऋषभ झाला यानी त्यांच्या मनातील आशयाचे अमूर्त चित्र साकारली आहेत.
  चित्र हा आशयाचा दृक भाषेतून मनाला सुखावणारी अनुभूती असल्याची प्रतिक्रिया कल्याण मधील चित्रकार प्रकाश काकड यांनी दिली.

Post a Comment

0 Comments