प्राध्यापकाची आगरी समाजावर पीएचडी पीएचडी मिळाल्यानंतर गावकऱ्यांकडून जंगी स्वागत


कल्याण , कुणाल म्हात्रे : उबार्ली गावातील एका प्राध्यापकाने  आगरी समाज या विषयावर पीएचडी मिळवली असून  यानंतर त्यांचे कौतुक करीत गावकऱ्यांनी  जंगी स्वागत केलं आहे. सुरेश तुकाराम मढवी असं या प्राध्यापकांचं नाव असून ते उंबार्ली गावात राहतात. गेल्या २३ वर्षांपासून मढवी हे कल्याणच्या के. एम. अगरवाल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. स्वतः आगरी समाजात जन्मलेल्या सुरेश मढवी यांनी २०१४ सालापासून आगरी समाजाचा अभ्यास सुरू केला. यानंतर "ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास" या विषयावर त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. आगरी समाजात शिक्षणाची सुरुवात १९६० पासून झालीत्यामुळे त्यापूर्वीचे कोणतेही लेखी संदर्भ उपलब्ध नसताना गावोगाव फिरून माहिती गोळा करत सुरेश मढवी यांनी या विषयाचा अभ्यास केला.आगरी कोळी समाज आद्यनिवासी असूनही विकासापासून वंचित असून आगरी समाजाचा परिचय इतर समाजांना व्हावाया हेतूनं आपण हा विषय निवडल्याचं सुरेश मढवी यांनी सांगितलं. दरम्यानसुरेश मढवी यांची पीएचडी पूर्ण झाल्यानंतर कल्याण तालुक्यातल्या ग्रामस्थांना मोठा आनंद झालाय. सोमवारी सुरेश मढवी यांचं उंबार्ली गावात जंगी स्वागत करण्यात आलं. सुरेश मढवी हे  आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे राजू पाटील हे सुद्धा यावेळी मित्राचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. राजू पाटील यांच्यासह सर्व वर्गमित्रांनी मिळून सुरेश मढवी यांचं स्वागत केलं. आपल्यासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं ग्रामस्थ आणि वर्गमित्रांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments