बारावे कचरा प्रकल्पातील ओला कचरा त्वरित न उचलयास प्रकल्प बंद पाडणार

■बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचा इशारा गेल्या वर्षभरापासून पालिकेकडून कचरा उचलण्यासाठी तारीख पे तारीख..


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण मधील आधार वाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उंबर्डे आणि बारावे येथे कचरा प्रक्रिया आणि वर्गीकरण प्रकल्प सुरु केले. बारावे येथे केवळ सुक्या कचऱ्यावर प्रकिया करणे आवश्यक असतांना जून २०२० पर्यंत याठिकाणी मोठ्या प्रमाणात ओला कचरा टाकण्यात आला आहे. या ओल्या कचऱ्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. गेल्या वर्षभरापासून पालिकेकडून हा ओला कचरा उचलण्यासाठी  येत्या पंधरा दिवसात हा ओला कचरा न उचलल्यास हा कचरा प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा बारावे गोदरेज हिल सामजिक संस्थेने दिला आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान तारांकित मानांकन २०२२ यासाठी १५ डिसेंबर २०२१ च्या अगोदर हरकती मागवल्या होत्या. त्यासाठी बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्था व सर्व परिसरातील सोसायट्यांनी या नामांकनासाठी हरकती नोंदवल्या आहेत. कारण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने जून २०२० रोजी बारावे ट्रान्सफर स्टेशन येथे अंदाजे दहा टन ओला कचरा अनधिकृतपणे टाकला आहे. या कचऱ्यामुळे आत्ता रोज अधून मधून सर्व परिसरामध्ये घाण दुर्गंधी सुटत आहे. नागरिकांना श्वास घेणे मुश्कील झाले आहे ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाच्या व्याधी होत आहेत.


याबाबत बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेने वारंवार कडोंमपा घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांना सांगत लवकरात लवकर येथून हा अनधिकृतपणे टाकलेला ओला कचरा उचलावा. मात्र ते फक्त आश्वासने देत आहेत लवकरात लवकर हा कचरा उचलण्यात येईल परंतु आजपर्यंत हा ओला कचरा तेथून उचललेला नाही.  आज एक वर्ष होऊन गेले तरी तो कचरा तेथून का हलवण्यात येत नाही. हा नागरिकांना व सामाजिक संस्थेला मोठा गहन प्रश्न पडला असल्याचे  बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडे यांनी सांगितले.


येत्या १५ दिवसात हा ओला कचरा इथून उचलला नाही तर संस्थेतर्फे व स्थानिक रहिवासी यांच्या  तर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल. तसेच बारावे कचरा प्रकल्पावर कोणत्याही प्रकारचा सुका कचरा टाकण्यास  बंदी घालून  सर्व कचऱ्याच्या गाड्या आडवून हा प्रकल्प बंद पाडू असा इशारा  बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेच्या वतीने पालिकेला देण्यात आला आहे.


दरम्यान याबाबत पालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता, येथील ओला कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरु असून पावसामुळे विलंब झाला असल्याचे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments