भिवंडीत वाहनतळ नसल्याने रस्तोरस्ती वाहन उभी राहिल्याने होत आहे वाहतूक कोंडी ,लाखो रुपये खर्चून बनविलेली सिग्नल यंत्रणा बंद


भिवंडी :दि.21 (प्रतिनिधी )  भिवंडी शहर नियोजन शून्यतेमुळे अक्षरशः बजबजपुरी होऊन राहिली असताना याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे असे खेदाने म्हणावे लागेल. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असताना शहरात मुख्य ठिकाणी एक ही वाहनतळ नसल्याने कामा निमित्त शहरात आलेल्या नागरीकांना वाहन उभी करायची कोठे या समस्येला सामोरे जावे लागत असताना रस्त्याकडेला वाहन उभी केल्यास वाहतूक पोलीस नो पार्किंग चा बाऊ करून कारवाई करीत असल्याने वाहनचालक दुधारी संकटात फसत आहे तर वाहने रस्त्यावर उभी असल्याने वाहतूक कोंडी चा सामना इतरांना करावा लागत आहे हे दुर्दैवी .


          भिवंडी पालिका मुख्यालया समोरील रस्त्या लगत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,पंचायत समिती , सहा निबंधक कार्यालय , पोलीस उपायुक्त अशी विविध शासकीय कार्यालय असल्याने संपूर्ण तालुक्यातून नागरिकांचा राबता या परीसरात असताना या ठिकाणी वाहनतळ नसल्याने वाहन धारकां समोर वाहन उभी  करण्याची समस्या आहे .


        तर वाहतूक विभागाने शहरातील 75 विविध भागात नो पार्किंग चे फलक लावून वाहन उभी करण्यास मनाई केली असताना वाहन नक्की कुठे नेवून उभी करायची याचे उत्तर कोणतीही यंत्रणा देत नाही .दरम्यान नुकताच एक महिन्या पूर्वी शिवाजी चौक येथे भव्य वाहनतळ पालिकेने उभारले असून ते शहरातील मुख्य कार्यालय परिसरात पासून दूर असल्याने त्याचा फायदा फक्त ग्रामीण भागातून बाजारहाट करण्यसाठी येणाऱ्या नागरीकांना होणार आहे .  


      सिग्नल यंत्रणा बंद लाखो रुपये खर्च पाण्यात 


         शहरातील वाहतूक सुरळीत होण्या साठी रस्त्यावर सिग्नल लावणे गरजेचे असताना यापूर्वी 2008 मध्ये केंद्र शासनाच्या अपरंपारीक ऊर्जा मंत्रालयाने सौरऊर्जेस प्राधान्य देण्यासाठी भिवंडी पालिक्स तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे अनुदान दिल्यावर सौर उर्जेवरील सिग्नल यंत्रणा उभारली परंतु ती सुरू न होताच सडून गळून पडली त्यानंतर पुन्हा चालू आर्थिक वर्षात पालिकेने वंजारपट्टी नाका ,कल्याण नाका ,आयजीएम रुग्णालय ,स्व आनंद दिघे चौक या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारणी करण्यसाठी तब्बल 60 लाख रुपये खर्च करण्यात आले .


           परंतु फक्त वंजारपट्टी नाका येथील सिग्नल यंत्रणा सुरू झाली तर स्व आनंद दिघे चौक येथील यंत्रणा उदघाटन केल्या नंतर अवघ्या एक तासा पासून बंद आहेत त्या आज ही सुरू झालेल्या नाहीत हे विशेष तर कल्याण नाका ,आयजीएम येथील यंत्रणा अजून उभारणीचे कामच सुरू झाले नाही त्यामुळे या योजने वरील पैसा नक्की गेला कुठे असा सवाल नागरीक विचारात असून सध्या पालिका मुख्यालया समोरील उड्डाणपुला खाली अघोषित वाहनतळ उभारले गेले असून तेथेच वाहन उभी केल्याने सर्वसामान्य जनतेला चालण्यासाठी रस्ता सुध्दा शिल्लक राहत नाही .

Post a Comment

0 Comments