बाहेर देशातील प्रवाशांना ७ दिवसांचे होम क्वारंटाईन बंधनकारक - डॉ. विजय सूर्यवंशी


■केडीएमसी क्षेत्रात ओमीक्रोनचा रुग्ण आढल्याणा नंतर प्रशासन सतर्क..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण कल्याण-डोंबिवलीत ओमीक्रोन चा रुग्ण आढल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलत काही सूचना देखील करण्यात आल्या आहेत. आता पर्यन्त केडीएमसी क्षेत्रात परदेशातून २९५ नागरिक आले असून त्यांची यादी केडीएमसीकडे प्राप्त झाली आहे.


          त्याच्याशी केडीएमसी प्रशासनाकडून संपर्क करण्यात येत असून त्यातील ८८ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून त्यातील ३४ जण निगेटिव्ह आली असून ४८ नागरिकांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तसेच मास्क परिधान न करणाऱ्यावर पोलीस व पालिका प्रशासनाकडून संयुक्त रित्या कारवाई करण्यात येणार असून बाहेर देशातील प्रवाशांना ७ दिवसांचे होम क्वारंटाईन     बंधनकारक असल्याचे केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडून सांगण्यात आले.


परदेशातून कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ऍट रिस्क (कमी धोक्याचे देश) आणि हाय रिस्क (अति धोक्याचे देश) देशातून येणाऱ्या व्यक्तींना ७  दिवसाचे होम कॉरंटाईन बंधनकारक आहे. या ७ दिवसांत नियंत्रण ठेवण्यासाठी कॉल सेंटरमधून फोनद्वारे संपर्क साधण्यासह केडीएमसीचे मेडिकल ऑफिसरही त्याठिकाणी सरप्राईज व्हिजिट करणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.


 तसेच ८ व्या दिवशी त्यांची कोवीड टेस्ट होणार असून त्यात निगेटिव्ह आले तरीही परत ७ दिवसांचे होम कॉरंटाईन आणि पॉझिटिव्ह आल्यास केडीएमसीच्या संस्थात्मक कॉरंटाईन केले जाईल. तर ज्या सोसायटीमध्ये अशा व्यक्ती राहत असतील त्या नियमानुसार होम कॉरंटाईन करतात की नाही याची खबरदारी सोसायटीने घेण्याचे निर्देश देत उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाईचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालता वावरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा व्यक्तींविरोधात उद्यापासून पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याची माहितीही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. याशिवाय लग्न समारंभ मोठे कार्यक्रमांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होतेय की नाही यावरही करडी नजर असेल असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments