अधिवेशनात विद्यापीठ विधेयक पारित केल्याने भाजपचे डोंबिवलीत निदर्शने


डोंबिवली ( शंकर जाधव ) महाविकास आघाडी सरकारने  अधिवेशनात चर्चा न करताच विद्यापीठ विधेयक पारीत करुन घेतल्याचा आरोप करत  डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात  भाजयुमो कल्याण जिल्ह्याच्या वतीने निदर्शने  करण्यात आले.
  

             भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम अध्यक्ष प्रदीप चौधरी, युवमोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सकपाळ, सौरभ सिंह, सचिव स्वानंद भणगे, चिंतन देढिया, अमोल साळुंके,वर्षा परमार आणि युवा मोर्चा जिल्हा आणि मंडल पदाधिकारी उपस्थित होते.


           यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल म्हणजे, शिक्षण क्षेत्रात वाझे तयार करण्याचा महाविकास आघाडीचा डाव आहे.२०१७ मध्ये विधानसभा आणि विधानपरिषद ह्या दोन्ही सभागृहात बहुमताने पारित झालेल्या विद्यापीठ सुधारणा कायद्या मध्ये महाविकास आघाडी सरकारने दडपशाहीने दुरुस्ती आणली शिक्षण मंत्र्यांना उप कुलगुरू म्हणून मान्यता देऊन  शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करण्याचे अधिकार दिले. 


          मिहीर देसाई म्हणाले, विद्यापीठ नियुक्ती, विद्यापीठाच्या खरेदी, परीक्षा विभाग, अभ्यासक्रम ह्या सर्वात आता राजकीय हस्तक्षेप होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी ह्याला विरोध करून नाराजी प्रकट केली आहे.भाजप ह्या अरेरावी आणि दडपशाही विरुद्ध हायकोर्ट मध्ये देखील दाद मागणार आहे.


         प्रत्येक विद्यापीठ, जिल्हा स्तरावर रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू. या वेळी आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आघाडी सरकारच्या मनमानी कारभार विरोधात फलक धरून, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला.

Post a Comment

0 Comments