राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिवा उपनगर यांच्या तर्फे रक्तदान शिबिर


दिवा, ठाणे, प्रतिनिधी  : तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे सीडीएस बिपिनजी रावत , त्यांच्या पत्नी आणि त्यांच्यासोबत हौतात्म्य प्राप्त झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याहेतू रविवार दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभाग दिवा पूर्व तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.


           ह्या रक्तदान शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली अर्पण केली. ह्या शिबिरात मुंब्रा नगर कार्यवाह अमित आयरे,  सेवा विभाग प्रमुख गिरीजेश दुबे आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून श्री रोहिदास मुंडे उपस्थित राहून स्वेच्छेने रक्तदान करून त्यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

0 Comments