शाळा सुरू झाल्या नंतरही पालकांचे मुलांच्या अभ्या साकडे विशेष लक्ष

■ऑनलाइन लर्निंगच्या पर्यायांमुळे आवश्यक साधने पालकांच्या हाती ~


मुंबई, १० डिसेंबर २०२१ : १८ महिन्यांहून अधिक काळ स्टडी-फ्रॉम-होम पद्धतीने शिक्षण घेतल्यानंतर आता परिस्थिती पुन्हा बदलू लागली आहे आणि स्वच्छता व सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेत शाळांनी मुलांसाठी आपली दारे पुन्हा एकदा उघडली आहेत. पॅनडेमिक-पूर्व काळाच्या तुलनेत या विषाणूसंसर्गाची लाट आल्यानंतरच्या काळात पालक आपल्या अभ्यासामध्ये अधिक लक्ष घालू लागल्याचे ब्रेनलीचे बहुतांश (५९ टक्के) विद्यार्थी सांगतात. यातील एक रोचक भाग म्हणजे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतरही यातील ७१ टक्के विद्यार्थ्यांचे पालक त्यांना अभ्यासात मदत करत आहेत. ऑनलाइन लर्निंगच्या पर्यायांमुळे आपल्या मुलांची शिकवणी घेण्यासाठी आवश्यक असलेली साधने पालकांच्या हाती लागली आहेत.


      पालकांच्या आपल्या पाल्यांच्या शिक्षणातील बदलत्या भूमिकेचे नेमके स्वरूप निश्चित करण्यासाठी ब्रेनली या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात १८७० विद्यार्थी सहभागी झाले होते. ६० टक्के पालकांना अधिकच्या मदतीसाठी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्ससारख्या पर्यायांची माहिती आहे ही सर्वेक्षणातून दिसून आलेली गोष्टही या निरीक्षणाला पुष्टी देणारी आहे. इतकेच नव्हे तर ४६ टक्‍क्‍यांहून अधिक पालक अशाप्रकारच्या ऑनलाइन लर्निंग साधनांची मदत घेत आहेत. भारतीय पालक मुलांच्या अभ्यासासाठी डिजिटल उपकरणे आणि तंत्रज्ञानाधारित साधने अधिक सहजतेने वापरत आहेत व मुलांनाही हे मंच वापरण्याची मुभा देत आहेत हे यातून स्पष्ट होते.


       नव्या शिक्षणव्यवस्थेमध्ये आपल्या मुलांनी टिकून रहावे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न पालक करत आहेत. ब्रेनली सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार सुमारे ५९ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात खासगी शिक्षक किंवा ट्यूटर्सची मदत मिळते. शाळा, ट्यूटर्स आणि ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म या सर्वांच समावेश असलेली एक सर्वंकष शिक्षणपद्धती आकाराला आल्यास विद्यार्थ्यांच्या संकल्पना पक्क्या होती, त्यांच्या मनातील शंका दूर होतील आणि त्यांच्या चौकस प्रश्नांवरील उत्तरे सापडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांची यशस्वी साथ देणा-या, वैयक्तीकृत शिक्षणाची गरज भागविण्यासाठी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्स अधिकाधिक प्रमाणात एकास-एक पद्धतीने शिकवण्या उपलब्ध करून देत आहेत.


   ब्रेनलीचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर राजेश बिसानी म्हणाले, "आमच्या ताज्या सर्वेक्षणातून हाती लागलेल्या निष्कर्षांनुसार पालक आता आपल्या मुलांची शैक्षणिक कामगिरी, अभ्यासातील यश याबद्दल जाणून घेण्यासाठी, त्यांना कोणत्या विषयांमध्ये सुधारणेची गरज आहे इत्यादी माहितीसाठी पालक-शिक्षक भेटीगाठींवर विसंबून राहण्याची गरज उरलेली नाही. तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन लर्निंग साधनांमुळे पालक आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी होत आहेत, इतकेच नव्हे तर मुलांना त्यांच्या अभ्यासात अधिक चांगल्या प्रकारे मदत करता यावी यासाठी स्वत:हून अशा प्लॅटफॉर्म्सकडून माहिती मिळवत आहेत. अशाप्रकारे आजच्या जगात पालक, ट्यूटर्स आणि व्हर्च्युअल शिक्षण साधनांद्वारे अभ्यासात वैयक्तिक पातळीवर लक्ष घातले जाणे विद्यार्थ्यांसाठी मौजेची गोष्ट बनली असताना शिक्षणाची हायब्रिड पद्धती अधिकाधिक कालसुसंगत ठरत चालली आहे."

Post a Comment

0 Comments