एनडीए परीक्षेत कल्याणच्या राज काळे याला यश


कल्याण, प्रतिनिधी  : वयाच्या १२ वर्षांपासून देश सेवेची इछा मनाशी बाळगून भारतीय संरक्षण दलातील अधिकारी होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एन.डी.ए. च्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक प्रशांत काळे यांचे सुपुत्र राज काळे याने यश मिळविले असून मुंबईसह संपूर्ण कोकण विभागातून उत्तीर्ण होणारा राज हा एकमेव विद्यार्थी आहे.


स्वर्गिय धर्मवीर आनंद दिघे संस्थांपित आणि शिवनिकेतन ट्रस्ट संचालित भारतीय सैनिकी विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयकल्याण तालुक्यातील खडवलीजि. ठाणे येथे शैक्षणीक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता १२ वी सायन्स मध्ये शिकणाऱ्या राज याने वयाच्या १२ व्या वर्षापासून अभ्यासाला सुरवात केली होती. त्याच्या या यशासाठी पुणे येथील अनीस डिफेन्स कॅरिअर अकॅडमी चे संचालक तथा गणिततज्ञ अनीस कुट्टी सर व त्यांचे सर्व सहकारी यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले. अखेर त्याच्या या अथक प्रत्नाला अखेर यश आल्याचे राज च्या वडिलांनी सांगितले.


राजचे वडील प्रशांत काळे यांनी स्वतः वकिलीची पदवी घेतली असून कल्याण पूर्व येथे जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवतात. राजची आई माधुरी प्रशांत काळे ही शिक्षिका असल्यामुळे घरचे वातावरण अभ्यासासाठी अनुकूल आहे. युपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या एन.डी.ए. ची ही परिक्षा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासलापुणे मार्फत देशसेवेत-भारतीय संरक्षण दलातील अधिकारी म्हणुन दाखल होण्यासाठी घेण्यात येतात.


या परीक्षेसाठी संपूर्ण देशातून लाखो विद्यार्थी प्रयत्न करीत असतात परंतु वयाची अट असल्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त १ किवां २ वेळा ही परीक्षा बसण्याची संधी मिळते. राज यांनी या संधीचे सोने करीत प्रथम प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करून मुंबईसह कोकण विभागाची मान उंचावली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून राज ने जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचे आशीर्वाद घेतले आणि जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी राजला पुढील वाटचालीसाठी शुभेचा दिल्या.

Post a Comment

0 Comments