कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण कसारा रेल्वे मार्गाची रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने शनिवारी सकाळच्या सुमारास सुमारे तासभर लोकल, मेल यांची रांग लागल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना कामावर लेटमार्कला सामारे जात पोहचावे लागले.
शनिवारी सकाळी ६.४५ वा सुमारास कल्याण शहाड रेल्वे मार्ग दरम्यान स्गिंनल यंत्रेणनेत तंत्रिक बिघाड झाल्याने कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील लोकल, मेल, एक्स्प्रेस सेवा विस्कळित झाली. रेल्वे मार्गा दरम्यान लोकल, एक्स्प्रेस, मेलच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.
ऐन पीक हवरच्या दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आँफिसमध्ये उशीरा पोहचावे लागल्याने लेटमार्कला सामारे जावे लागले. तर काही रेल्वे ने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी घरी जाणे पसंत केले. तब्बल तासाभरानंतर विस्कळित झालेली कल्याण कसारा रेल्वे सेवा सुरळीत झाली.
"कल्याण कसारा रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना लेट मार्कला सामारे जाण्याची वेळ आली असल्याने रेल्वे सेवा सुरळीतपणे राहण्यासाठी सिग्नल यंत्रणा अत्याधुनिक करीत अपडेट कशी राहिल याकडे रेल्वे प्रशानाने लक्ष देणे गरजेचे आहे."
"रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता सकाळच्या सुमारास कल्याण शहाड दरम्यान सिग्नल यंत्रणा फेल्युर झाली होती यास दुजोरा देत काही काळात विस्कळित झालेली कल्याण कसारा मार्गावरील रेल्वे सेवा पुर्ववत सुरु झाल्याचे सांगितले."
0 Comments