जीवन मूल्यांवर आधारित विविध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देवून गौरव ठाणे महापालिका व हेमा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम


ठाणे , प्रतिनिधी  : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि हेमा फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जीवन मूल्यांवर आधारित विविध स्पर्धेतील विजेत्यांना आज कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.


         यावेळी उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका स्नेहा आंब्रे, नगरसेविका मनीषा कांबळे, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, हेमा फाउंडेशनच्या अनिता महेश्वरी, महेंद्रजी काब्रा, विजयम रवी, नारायण अय्यर, सुंदर अय्यर आणि धीरज सोनार, गट अधिकारी संगीता बामणे, अस्लम कुंगले यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका आदी उपस्थित होते.


         ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि हेमा फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या शाळांमध्ये जीवन मूल्यांवर आधारित विविध स्पर्धा पार पडली. या स्पर्धेस शिक्षक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत आंचल पांडे (शाळा क्र. 7), वैष्णवी अन्नदाते (शाळा क्र. 69), सुमेशा कीर्तने (शाळा क्र. 64), योगिता मोटे (शाळा क्र.60), रिशा राम (शाळा क्र.60 ), कृष्णा कीर्तने (शाळा क्र.7) व प्रिया सिंग (शाळा क्र.60 ) यांनी तर शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये प्रणोती जाधव ( शाळा क्र. 69 ), संचिता पवार (शाळा क्र.60), डॉ. कमल गवई (शाळा क्र. 64), मो. अयाज (शाळा क्र. 63), स्मिता जाधव (शाळा क्र.7) आणि प्रियांका तानावडे (शाळा क्र.27) यांनी क्रमांक पटकाविला आहे. तसेच महापालिकेच्या शाळा क्र. 44,130,7,13, 77,101,41, 37,14 आणि शाळा क्र. 10 यांनी सदर स्पर्धेत विशेष कामगिरी केली. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे गोल्ड, स्लिव्हर व प्लॅटियम अवॉर्ड देवून गौरवविण्यात आले.


Post a Comment

0 Comments