एक्‍स्‍ट्रामार्क्‍स कडून 'एक्‍स्‍ट्रा मार्क्‍स वीकेण्‍डर'चे आयेाजन


मुंबई, ३० डिसेंबर २०२१ : एक्‍स्‍ट्रामार्क्‍स ही भारताची सर्वात विश्‍वसनीय एड-टेक कंपनी पहिल्‍यांदाच दोन-दिवसीय अध्‍ययन व मनोरंजनपूर्ण महोत्‍सव 'एक्‍स्‍ट्रामार्क्‍स (ईएम) वीकेण्‍डर'चे आयोजन करण्‍यास सज्‍ज आहे. शिक्षण, मनोरंजन व प्रेरणेच्‍या माध्‍यमातून अध्‍ययनाला प्रशंसित करण्‍यासाठी हा व्‍हर्च्‍युअल कार्यक्रम डिझाइन करण्‍यात आला आहे. हा महोत्‍सव विद्यार्थी, पालक व शिक्षकांना त्‍यांच्‍या घरांमध्‍येच आरामात संपन्‍न व सर्वोत्तम अध्‍ययन अनुभव देईल. एक्‍स्‍ट्रामार्क्‍स प्रभावी व्‍हर्च्‍युअल अनुभवाची निर्मिती करेल आणि https://experiences.extramarks.com/weekender/ वर १५ ते १६ जानेवारी २०२२ (दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत) दरम्‍यान प्रख्‍यात प्रभावी नि‍र्माते, कथाकार व काही प्रेरणादायी यशस्‍वी व्‍यक्‍तींच्‍या लाइव्‍ह सत्रांचे आयोजन करेल    


      या कार्यक्रमाच्‍या दृष्टिकोनाबाबत सांगताना एक्‍स्‍ट्रामार्क्‍स एज्‍युकेशनच्‍या विपणन विभागाच्‍या उपाध्‍यक्ष नेहा मिश्रा म्‍हणाल्‍या, ''ईएम वीकेण्‍डरसह आमची अध्‍ययनाच्‍या आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍याची इच्‍छा होती. विद्यार्थ्‍यांना कार्यशाळा, गेम्‍स व संगीत यांचा आनंद देण्‍यासोबत खेळीमेळीने शिक्षण देण्‍यात येईल. तसेच त्‍यांना जीवनाच्‍या विविध स्‍तरांमधील प्रख्‍यात प्रवक्‍ते व प्रेरणादायी निर्मात्‍यांकडून प्रेरणादायी मार्गदर्शन देखील मिळेल. तुम्‍ही कुठेही असा, शिक्षण पूर्ण करता येऊ शकते हे भावना बिंबवण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे आणि या कार्यक्रमासह आमचा तरूण विद्यार्थ्‍यांना संबंधित संवाद, प्रेरणा व मनोरंजनाच्‍या माध्‍यमातून शिक्षण घेण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍याचा मनसुबा आहे.''


   क्‍लासरूम्‍स व पुस्‍तके अशा पारंपारिक अध्‍ययन पद्धतींपलीकडे जाणा-या कंपनीच्‍या अद्वितीय दृष्टिकोनावर आधारित एक्‍स्‍ट्रामार्क्‍सच्‍या 'ईएम वीकेण्‍डर'चे पहिले वार्षिक पर्व विविध व्‍हर्च्‍युअल चर्चासत्रे व कार्यशाळांमधील लाइव्‍ह सत्रांचे आयोजन करत या महोत्‍सवाला अधिक खास बनवेल. पोषण, मानसिक आरोग्‍य, पालकत्‍व, सर्जनशीलता, फोटोग्राफी, संगीत, उद्योजकता, सार्वजनिक चर्चा अशा क्षेत्रांमधील प्रख्‍यात कथाकार, प्रेरणादायी यशस्‍वी व्‍यक्‍ती व प्रभावी निर्माते या सत्रांचे नेतृत्‍व करतील.  


        शिक्षण व मनोरंजनाला एकत्र करत शिक्षक व उद्योग तज्ञांचे प्रख्‍यात पॅनेल मानसिक आरोग्‍य, मुलांचे सक्षमीकरण, आवडीला करिअरमध्‍ये बदलणे, प्रभावी वेळ व्‍यवस्‍थापन, सहका-यांच्‍या दबावाची हाताळणी आणि पोषणासंदर्भात जागरूकता विकसित करणे अशा विविध प्रचलित समस्‍यांचे निराकरण देखील करतीलज्‍यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.


      उपस्थितांना एमपॉवर येथील वरिष्‍ठ मानसोपचार तज्ञ व सल्‍लागार डॉ. झिराक मार्कर यांच्‍यासोबत मानसिक आरोग्‍याबाबत चर्चा देखील करता येईल. तसेच म्‍युझिकोलॉजीचे अनुराग दिक्षित यांच्‍यासोबत मुलांच्‍या सर्वांगीण विकासामध्‍ये संगीताच्‍या महत्त्‍वाबाबत चर्चा करता येईल, ॠजुता दिवेकर यांच्‍याकडून उत्तम पोषणाबाबत माहिती मिळवता येईल, वास्‍तविक जीवनात पालक असलेल्‍या ताहिरा कश्‍यप खुराणा यांच्‍याकडून प्रेरणा मिळेल आणि भारतीय संघाच्‍या कर्णधार मिथाली राज यांच्‍यासोबत क्रिकेटसंदर्भात चर्चा करता येईल. 


      ईएम वीकेण्‍डर वास्‍तविक जीवनातील संवाद साधण्‍याची आणि तुमच्‍या बुद्धीला चालना देण्‍याची संधी आहे.एक्‍स्‍ट्रामार्क्‍स वीकेण्‍डर' सर्वांसाठी खुले आहे. इच्‍छुक सहभागी क्‍यूआर कोड स्‍कॅन करत किंवा ऑफिशियल वेबसाइट:https://experiences.extramarks.com/weekender/ ला भेट देत विशेष रजिस्‍टर-ओन्‍ली व्‍यासपीठाच्‍या माध्‍यमातून सहभाग घेऊ शकतात.

Post a Comment

0 Comments