अनधिकृत बांधकामां बाबत पालिका आयुक्त आक्रमक येत्या तीन महिन्यात सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणार केडीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय..


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण डोंबिवली मनपाने अनाधिकृत बांधकाम रोखण्यासाठी अँक्शन प्लाँन तयार करीत प्रभावी अमंलबजावणी  मोहीम सुरु करणाच्या दुष्टीकोनातुन रूपरेषा आखली असल्याने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांची आता खैर नाही.


 कल्याण-डोंबिवली मनपाच्या वतीने आणि पोलिस विभागाच्या वतीने सातत्याने अनधिकृत बांधकामाच्या वेळी धडक मोहीम सुरू असते तरीदेखील अनधिकृत बांधकाम अनेक ठिकाणी होताना दिसत आहेत. याला आळा बसण्यासाठी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीयांनी कल्याण परिमंडळ ३ चे डीसीपी सचिन गुजांळ, महावितरण आधिकारी यांची संयुक्त बैठक घेत मनपाने  कृती आराखडा अनधिकृत बांधकामे तोडण्याबाबत तयार केला. स्थायीसमिती दालनात गुरूवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. महावितरणने यापुढे कोणत्याही परिस्थितीत अनाधिकृत बांधकामांना विघुत कनेक्शन देऊ नये. महावितरण आधिकार्यांनी या निर्यणयास समंती दिली.


आयुक्तांनी पाणी न देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला असल्याचे सागंत अनधिकृत बांधकाम करणाऱ्याकडून अनाधिकृत बांधकामे तोडण्याचा खर्च वसूलीसाठी मनपा क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीचे कुठेही  प्रॉपर्टी कार्ड, मालमत्तायांच्यावर त्या खर्चाचा बोजा टाकणे. अनाधिकृत बांधकाम सुरु असलेल्या जमीन मालकांच्या जमीनीच्या साताबारावर खर्चाचा बोजा लावणे. जेणे करून अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या चाप बसेल यासाठी निर्णय घेतला आहे. 


येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी प्रत्येक वार्डात व्यापक मोहीम राबवित यापुढे कुठल्याही वॉर्डमध्ये नवीन अनधिकृत बांधकाम सुरू होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सर्व सूचना ऑफिसर्स आणि पोलिस अधिकारी यांना दिल्या आहेत. अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करीत पोलिस प्रशासनाच्या मदतीने कडक कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.


नवीन अनाधिकृत बांधकाम सुरू होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सर्व सूचना पोलिस अधिकारी यांना दिल्या असून यापूर्वी इमारतीबैठ्या चाळी अशी सुमारे २० हजार अनाधिकृत बांधकामाबाबत सुमारे १५ हजार अनाधिकृत सदनिका धारकांना नोटीस बाजवित कागदपत्रे सादर करण्याबाबत सांगितले असून  ३५० अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भात आढावा घेतला असुन यापुढे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात एमआरटीपी गुन्हे पोलीस प्रशासनाच्या माध्यम दाखल करीत कारवाई केली जाईल.


 अ प्रभागक्षेत्रातील टिटवाळा  ग्रामीण हद्दीतील अनाधिकृत बांधकाम कारवाई बाबत ग्रामीण एसपींशी संपर्क साधला असून कल्याण शीळफाटा रस्त्यालगत असलेल्या अनाधिकृत भंगार दुकाने हटविण्याची मोहिम तसेच रिंग रोड रस्त्यालगत असणारी अनाधिकृत दुकाने हटवित रस्त्यालगत अनाधिकृत बांधकाम होणार नाही याबाबत प्रशासनाची करडी नजर असणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments