जनतेची कामे कायम करत करा, पालिकेवर शिवसेनेची सत्ता नक्की येणार शिवसेना शहर प्रमुखांचा विश्वास

  


डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेना कायम जनतेसाठी पुढे आली आहे. जनतेच्या हिताचे काम करणे शिवसेना कधीही विसरली नाही.करोना काळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सर्व शिवसैनिकांनी रुग्णांना मदत केली.शिवसेनेने जनतेला या काळात खूपच मदत केली. जनता शिवसेनाला कधीहि विसणार नाही. म्हणून जनतेची कामे कायम करा, पालिकेवर  सत्ता शिवसेनेचीच येणार आहे.बाकीचे निवडणुका आल्या कि कार्यालये उघडतात,नंतर बंद करतात.परंतु शिवसेना शाखेची दरवाजे कायम जनतेच्या मदतीसाठी उघडली असतात असे शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी एका कार्यक्रमात सांगितले.


    स्व.हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेकडील गणेशनगर येथील हापसीबाबा उद्यानजवळील त्रिमूर्ती सोसायटीतील त्रिमूर्ती हॉलच्या मागे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर भरविण्यात आले होते.यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे,माजी नगरसेविका रेखा म्हात्रे,माजी नगरसेवक तात्या माने,  युवा पदाधिकारी राहुल म्हात्रे,गुलाब म्हात्रे,महिला पदाधिकारी कविता गावंड,अक्षय म्हात्रे,सोपान पाटील,संतोष चव्हाण,सतीश मोडक,तुषार शिंदे,प्रमोद कांबळे,अंकित जाधव,चंद्रकांत महाजन,श्रीकांत बिरमोळे, नरेश कदम,अस्मिता खानविलकर,केतकी पोवार,आदि पदाधिकारी उपस्थित होते.


      शिबिरात आरोग्य तपासणी,मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया,डोळे तपासणी,मोफत चष्मे वाटप,किडनी स्टोन शस्त्रक्रिया, कर्करोग, नाक,कान,घसा,ई.सी.जी. एॅन्जिओग्राफी व एडोल्पालासस्टी आदि करण्यात आले.या शिबिराचा शहरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला.यावेळी शहरप्रमुख मोरे म्हणाले,पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होणार आहेत.शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी अधिक जोमाने कामाला लागले पाहिजे. मात्र निवडणुका समोर ठेवून शिवसैनिक काम करत नाही.करोना काळात शिवसैनिक जनतेच्या मदतीला धावली होती आणि यापुढेही मदत करतच राहणार.खासदार डॉ.शिंदे यांनी करोना काळात जनतेची केलेली मदत नागरिकांच्या कायम लक्षात राहतील.

Post a Comment

0 Comments