दोन मोटार सायकल चोरट्यांना अटक ... ९ मोटार सायकल हस्तगत


डोंबिवली ( शंकर जाधव ) दोन मोटरसायकल चोरट्यांना विष्णूनगर पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या.अटक आरोपींनकडून पोलिसांनी ९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

 
           मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप शांताराम पाटील ( २५) आणि रोहित अविनाश यादव (३१ ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरून ४ नोव्हेंबर रोजी सकाळी एक मोटर सायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. विष्णुनगर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडणे व त्यांच्या पथकाने तपासास सुरुवात केली.


         घटना घडलेली ठिकाणी पोलीसांनी  सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. याठिकाणी दोन इसम गुन्हयात चोरीस गेलेली मोटारसायकल ढकलत घेवून जात असल्याचे दिसुन आले. गुप्त बातमीदारांकडून मोटरसायकल चोरट्याची माहिती मिळवली. आरोपी दिलीप पाटील त्यांचे ठिकाण बदलत असताना व शेवट मोबाईल बंद असताना तपास  करुन जळगाव परोळा येथुन ताब्यात घेतले. तर त्याचा दुसरा साथीदार  रोहित यादव याला पोलिसांनी ल्याण पूर्व चिंचपाड येथून ताब्यात घेतले. 


       अटक केलेल्या दोघा आरोपीने  मोटारसायकली चोरीचा  गुन्हा केल्याची कबुली  आहे.आरोपी  दिलीपने विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी ५ मोटारसायकल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्याकडुन त्या हस्तगत केल्या आहेत. त्याच्याकडुन आणखी ३ मोटारसायकल अशा एकूण ९ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.तर  आरोपी रोहित याने दिलीप सोबत एका गुन्ह्यात मोटारसायकल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Post a Comment

0 Comments