संविधान दिन हा प्रत्येक भारतीयांचा गौरव दिन आहे - पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी

■कल्याण मधील संविधान दिन गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन..

 

कल्याण , प्रतिनिधी  :  संविधानाने आम्हाला स्वातंत्रसमताआणि बंधुता बहाल केली आहेसंविधानामुळे प्रत्येक भारतीयाला समान अधिकार प्राप्त झाले आहेत म्हणूनच संविधान दिन हा प्रत्येक भारतीयांचा गौरव दिन आहे असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आचार्य अत्रे रंग मंदिरात पार पडलेल्या संविधान दिन गौरव सोहळ्यात केले. 


          गेल्या अनेक वर्षाहून अधिक काळ सेवा भावी कार्यात अग्रेसर असलेल्या युनायटेड बुद्धिस्ट  अँण्ड आंबेडकराईट  फाऊंडेशन संस्थेच्या वतीने कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक क्षेत्रात सेवाभावी कार्यात अग्रभागी असलेल्या समाज सेवकांचा 'लोकसेवा गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.


कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमास कल्पाण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी माजी आयुक्त आणि विद्यमान राज्य अनुसुचित जाती जमातीच्या आयोगाचे सदस्य आर. डी. शिंदे, मुरबाडचे प्रांत अधिकारी रोहितकुमार राजपूत, भिवंडी - निजामपूर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, माजी महापौर रमेश जाधव, युनायटेड बुद्धीस्ट अॅण्ड आंबेडकराईट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.


दैनिक भारत लोकधारा च्या ८ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पत्रकार आनंद गायकवाडपत्रकार कुणाल म्हात्रे यांच्यासह माजी महापौर रमेश जाधवदिलीप वाळंजराजेश पुरस्वानीड़ॉ. के. आर. खरात, योजना ठोकळे कुणाल इंगळेअरुण पाठारे,  कैलाश भंडारकर,   अण्णा रोकडे,   विशु म्हात्रेदिपक शिंदे,  चंद्रकांत पोळराजेश गायकवाड,   सुशील मनोहर,  शितल मंढारी,   अमित पवार,   सारीका कदमराखी बोराडे आदींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजासाठी भरीव योगदान दिल्या बद्दल 'लोकसेवा गौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला . तसेच उपस्थित अन्य मान्यवरांचाही संविधानाच्या उद्देशीकेच्या प्रती देउन सन्मान करण्यात आला.


यावेळी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणात संविधानाचे महत्व पटवून देतांना सांगितले  की आपल्या संविधान दिन हा संपूर्ण भारतीयांसाठी खरोखरच गौरव दिन आहे.  आपल्या संविधानामुळे आपल्या देशाचे संपूर्ण जगात नाव लौकीक आहेएक आदर्श संविधानावर चालणारा आदर्शवत देश म्हणून संपूर्ण जग आपल्या देशाकडे पहात आहे.  असे हे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिले आहे म्हणूनच संविधान दिनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे नतमस्तक झाले पाहिजे. प्रदिप जगताप यांनी आजच्या संविधान गौरव दिनी समाजात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला आले या मुळे प्रदिप जगताप हे कौतुकास पात्र आहेत असेही ते म्हणाले.


या देशातून जातांना लॉर्ड माउंट बॅटन याने हे संविधान जास्त दिवस टिकणार नाही असे म्हटले होतेपरंतु मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान इतके मजबूत केले आले की संविधानामुळे सत्तर वर्षांनंतरही आपला देश एकसंघ आणि सर्व समावेशक असा असल्याचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी आयुक्त आर. डी. शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.


भिवंडी निजामपूर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही संविधानाच्या अनेक वैशिष्ठ पूर्ण बाबींचा उल्लेख करीत आपल्या भाषणात सांगितले कीआपल्या देशातील जो कोणी साहेब झाला आहे तो केवळ डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्याच संविधानामुळे झाला आहेम्हणूनच लोकांनी लोकांना दिलेल्या राज्य घटनेची आपण शपथ घेतो असेही ते म्हणाले.


या संविधान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते दै भारत लोकधाराच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तर कोरोना काळातून मुक्त झालेल्या रसिकांचे मनोरंज होउन त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलावे यासाठी या सोहळ्या दरम्यान 'गंध स्वरांचाया संगित कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments