कोवीड रुग्णालयात पळून गेलेल्या आरोपीला ७ महिन्यां नंतर दादर नगर हवेली मधून अटक


कल्याण , कुणाल  म्हात्रे : कोवीड रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला अखेर ७ महिन्यानंतर डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी सातत्याने आपला ठावठिकाणा बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.


एका चोरीच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी मे महिन्यात राजकुमार बिंद याला अटक केली होती. याच दरम्यान त्याची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला होता. म्हणून उपचारार्थ त्याला भिवंडी येथील टाटा आमंत्रा येथे दाखल करण्यात आले. मात्र १० मे ला तो कोवीड रुग्णालयातून पळून गेला.


 त्याच्यावर कोनगांव पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या सात महिन्यापासून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी तांत्रिक मदतीचा आधारे फरार आरोपी राजकुमार याला केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली च्या सिल्वासा येथून अटक केली.


Post a Comment

0 Comments