खो खो स्पर्धेत ठाणे संघ विजयी


कल्याण, प्रतिनिधी : क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेजिल्हा क्रीड़ा अधिकारी ठाणे आणि राजश्री शाहू महाराज विद्यालयरबाले नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया मुंबई विभाग खो खो स्पर्धा नुकत्याच शाहु महाराज विद्यालय च्या क्रीडांगणावर मंगळवारी पार पडल्या. नवी मुंबई महानगरपालिका माजी महापौर सुधाकर सोनावणे आणि ठाणे क्रीड़ा अधिकारी कार्यालय येथील झुबेर सर यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. यामध्ये मुंबई विभागातील एकूण ५ मुलांचे आणि ५ मुलींच्या संघानी आपला सहभाग नोंदवला.


     यात मुलींमध्ये मुंबई उपनगर विरुद्ध ठाणे अंतिम सामना रंगला यात ठाणे संघाने मुंबई उपनगर संघावर ७ गड़ी राखून विजय संपादन केला. तसेच मुलांमध्ये  मुंबई उपनगर आणि ठाणे यात अंतिम  सामना रंगला या अतितटीच्या सामन्यात ठाणे जिल्ह्याने १ मिनट राखून विजयश्री खेचुन आणली. या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.


      या स्पर्धेमधुनच विजयी संघ म्हणजेच डी व्ही एस विद्यालय कोपरखैरणे ठाणे जिल्हा मूली संघ आणि विहंग क्रीड़ा मंडळ ऐरोली ठाणे हा मुलांचा संघ मुंबई विभागातुंन पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खेलो इंडिया खो खो स्पर्धेकरीता पात्र ठरला असून सोबत मैदानी निवड चाचणी मधून ५ मुले आणि ५  मूली यांची सुद्धा निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments