५ वर्षात सत्ताधारी एक रस्ता बनवू शकले नाहीत...दिवा वसियांच्या सुरक्षेसाठी रोहिदास मुंडे यांचे लाक्षणिक उपोषण


दिवा ( शंकर जाधव ) अनेक वर्ष ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता विराजमान आहे. मात्र या महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहर विकासापासून वंचित राहिल्याने येथे विकासचा `दिवा` लागलाच नाही. कायम असुरक्षितता, अर्धवट रस्ते, रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य यांनी हे शहर अंधारात राहिले.


  

        या शहराला विकासाचा प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी भाजपचे पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे.अनेक वेळेला प्रशासनाकडे पाठपुरावा करूनहि याकडे कामाडोळा असल्याने मुंडे यांनी सोमवारी दातिवली तलावाजवळ लाक्षणिक उपोषण केले. ५ वर्षात सत्ताधारी एक रस्ता बनवू शकले नाहीत असा आरोप यावेळी मुंडे यांनी केला आहे.  

 

             ५ लाख दिवावासीयांच्या सुरक्षित प्रवासासाठी दिवा आगासन रस्ता लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे असे मत भाजपचे रोहिदास मुंडे यांनी सोमवारी निषेध आंदोलनात केले.दिवा आगासन रस्त्याच्या गलथान कारभारविरोधात भाजपचे पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी सोमवारी दातीवली तलाव येथे निषेध आंदोलन केले.दिव्यातील रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या मयूर दंतवाणी यांचे नातेवाईक महेश जनगारीया हेही उपोषणात बसले होते.          यावेळी भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील,आर. पी. आई.अध्यक्ष एकनाथ भगतविजय भोईर,सचिन भोईरयुवराज यादव ,राजश्री मुंडेसमीर चव्हाण,रमेश यादव,अनिल शाह,अजय सिंग,रोशन भगत,जयदीप भोईर,अशोक सोळंकी,प्रवीण पाटील,मधुकर पाटील,वीरेंद्र गुप्ता हेही उपोशांस बसले होते.

  यावेळी मुंडे म्हणाले, दिवा आगासन रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने हा रस्ता अपघात व वाहतूक कोंडीचा रस्ता झाला आहे.          दिवा आगासन रस्त्यावर अपूर्ण कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.वाहतूक कोंडी अर्धवट कामामुळे होते.याशिवाय अनेक ठिकाणी गलथान कारभारामुळे आजही अपघाताची शक्यता अधिक आहे.नुकताच एका तरुणाला रस्त्याच्या गलथान कारभारामुळे जीव गमवावा लागला. वारंवार मागणी करूनही हा रस्ता वेळेत पूर्ण केला जात नाही या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments