अक्षय कुमार प्रजापतीची रौप्य कामगिरी

 


कल्याण : तूर्कीची राजधानी इस्तंबूल येथे झालेल्या एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१ मध्ये कल्याणचा सुपुत्र अक्षयकुमार प्रजापती याने चमकदार कामगिरी करत रौप्य पदकाला गवसणी घातली. ६६ किलो वजनी गटात ( ज्युनिअर ) ५२९.५ किलो वजन उचलत  अक्षयने ही कामगिरी पार पाडली. एकूण दोन पदके जिंकून कल्याणच्या या विराने भारताचा तिरंगा तुर्की येथे मानामध्ये मिरविला.


प्रजापती हा शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याच्या यशामुळे सर्व विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाल्याचे मत शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके यांनी व्यक्त केले. अध्यक्ष जयंती हरियासंचालक एस.एस शिवशरण व प्रभारी प्राचार्या प्रा. कोमल चंदनशिवे यांनी अक्षयचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments